गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 27 एप्रिल 2019 (10:29 IST)

डॉन अरुण गवळीचा महायुतीला पाठींबा

लोकसभा निवडणुक सर्व अर्थाने आता शेवटच्या टप्प्यात असून, निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या 29 एप्रिलला देशात  होणार आहे. या कारणामुळे सर्वच पक्षांचा प्रचार जोरदार सुरु आहे.
दक्षिण मुंबईच्या राजकारणात  गँगस्टर अरुण गवळीच्या पक्षाचं नाव जोडलं गेले असून या ठिकाणी निवडणुकीची रंगत वाढली आहे. अरुण गवळीच्या ‘अखिल भारतीय सेना’  पक्षाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा  महायुतीला  पाठिंबा दिला आहे.
 
गवळीच्या अखिल भारतीय सेनेने दक्षिण मुंबईचे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना  पाठिंबा जाहीर केला असून,  यासंदर्भात अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी, मुलगी गीता गवळी आणि विजय अहीर यांच्याशी महायुतीचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर आणि बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली आहे. यावेळी गीता गवळी यांनी त्यांचा पक्ष हा महायुतीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.