शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2019 (16:36 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळं लोकांनी याचा विचार करावा आणि मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवू नये. भाजपचे खासदार निवडून येणार नाही याची दक्षता घ्यावी”, वंचिuत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
 
पुण्यात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. शरद पवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली असली तरी सुप्रिया सुळेंचा पराभव होणार नाही, असा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला.यावेळी प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि दुष्काळावरुन आघाडी आणि युतीला धारेवर धरलं.