आज अंतिम मुदत आहे मतदार यादीत नावनोंदणीसाठी
लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या 10 दिवस अगोदरपर्यंत मतदार नोंदणी अथवा दुरुस्ती करता येते. त्यानुसार पुणे शहरात उद्या (दि. 25) नाव नोंदणी करता येणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 18 वर्ष पूर्ण झालेला मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी मतदार नोंदणी सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, बारामती, शिरूर व मावळ ही चार लोकसभा मतदार संघ असून, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात यासाठी मतदान होणार आहे. पुणे शहर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील नव मतदारांना व नावात दुरुस्ती अथवा बदल येत्या सोमवारपर्यंत (दि.25 ) करता येणार आहे. मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदारांना 30 मार्चपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.