शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (07:22 IST)

काय म्हणता, हिरव्या रंगाचे बलक असणारे अंड

केरळच्या मल्लपुरम येथे राहणारे ए के शिहाबुद्दीन यांनी सांगितले की, कोंबडीने त्यांच्या कुक्कुटपालनमध्ये (पोल्ट्री फॉर्म ) हिरव्या रंगाचे बलक असणारे अंडे घातले आहेत. मी आणि माझे कुटुंब गेल्या ९ महिन्यांपासून ही अंडी खात असून आम्हाला कोणतीही समस्या किंवा आजार झाला नाही. तसेच, शिहाबुद्दीन म्हणाले की, काही आठवड्यांपूर्वी त्यांनी आपल्या कोंबड्यांनी असे अजब प्रकारचे अंडे घातल्याने त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यानंतर, ते अधिक प्रमाणात व्हायरल ही होऊ लागले. 
 
केरळच्या अ‍ॅनिमल सायन्स युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी सांगितले की, कोंबडीच्या आहारामुळे असे घडले असावे. जर कोंबड्यांच्या खाण्यापिण्यात हिरव्यागार खाद्यपदार्थाचा समावेश असेल, तर असा प्रकार घडू शकतो. विद्यापीठाच्या कुक्कुट विज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक, डॉ. शंकरलिंगम यांनी सांगितले की, कोंबड्यांना कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ देण्यात आले हे स्पष्ट होण्यासाठी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शिहाबुद्दीनला कोंबड्यांना दिले जाणारे खाद्य पदार्थ त्याच्याकडून मागवून घेतले होते.