बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (10:58 IST)

पीएम नरेंद्र मोदी यांना यूएनचे प्रतिष्ठित 'चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्र (यूएन)चे प्रतिष्ठित ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ अवॉर्डाने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी सोबतच फ्रांसचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रों यांना देखील हे अवॉर्ड देण्यात आले आहे.  
 
दोन्ही नेत्यांना आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाच्या संबंधांमुळे त्यांचे प्रयत्न आणि पर्यावरण कारवाईवर मदत वाढवण्यासाठी नीती नेतृत्व श्रेणीत हे अवॉर्ड देण्यात आले आहे.  
 
तसेच पंतप्रधान मोदी यांची 2020 पर्यंत भारताहून एकवेळा प्रयोगात येणार्‍या प्लास्टिकचा खात्मा करण्याच्या प्रतिज्ञेला महत्वूपर्ण मानण्यात आले आहे.  
 
कोची आंतरराष्ट्रीय हवाई अड्डाला 'नवीकरणीय ऊर्जेच्या उपयोगात नेतृत्व' करण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  
 
पर्यावरणासाठी वैश्विक करारावर फ्रांसचे राष्ट्रपती मॅक्रों यांची प्रशंसा करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे चॅम्पियन ऑफ द अर्थ संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठित पर्यावरणी अवॉर्ड आहे.