testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मलाच इंदुरीकर महाराजांनी पाठिंबाच दिला आहे : थोरात

balasaheb thorat
Last Modified मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (10:35 IST)
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर येथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर दिसल्यानंतर इंदुरीकर महाराज बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त फेटाळले होते. त्यानंतर आता आमदार थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

याआधी संगमनेरमध्ये
मुख्यमंत्र्यांच्या महाजानादेश यात्रेच्यावेळी अचानक व्यासपीठावर आलेल्या इंदोरीकर महाराजांनी मुख्यमंत्र्यांशी केलेल्या कानगोष्टींमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना
इंदुरीकर महाराजांच्या उमेदवारीबद्दल पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, 'इंदुरीकर महाराज हे समाजातील चुकीच्या प्रथांवर बोट ठेवणारे व्यक्तिमत्व आहे. निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही. मात्र, त्यांनी पत्रक काढून राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी मला पाठिंबाच दिला आहे. समाजप्रबोधन करण्याचे त्यांचे मोठे काम असून त्यामुळे अनेक चुकीच्या प्रथा बंद झाल्या असल्याचेही बाळासाहेब थोरात सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

Batten: बॅटन आजाराच्या फक्त एका रुग्णासाठी त्यांनी बनवलं

Batten: बॅटन आजाराच्या फक्त एका रुग्णासाठी त्यांनी बनवलं औषध
अमेरिकेत राहणारी आठ वर्षांची मिला एका असाध्य आजाराने ग्रस्त आहे. मज्जासंस्थेशी संबंधित या ...

किम जोंग उन: पवित्र डोंगरावर उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची ...

किम जोंग उन: पवित्र डोंगरावर उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची घोड्यावरून रपेट
उत्तर कोरियातील सर्वात उंच आणि पवित्र समजल्या जाणाऱ्या पॅकटू पर्वताला नेते किम जोंग उन ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये अखेर करार झालाय
युनायटेंड किंग्डम आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रेक्झिटसंदर्भातला एक करार निश्चित झाला ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी
वणी (जि. यवतमाळ ) येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य ...

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे
ऑक्टोबर महिना संपत असून काही दिवस बाकी आहेत. उर्वरीत दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ...