शिवसेनेच्या मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत

sanjay raut
Last Modified बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (15:18 IST)
राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नाहीच, राज्यात ते राज्य करु शकत नाहीत असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले
आहे. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना १०० चा आकडा पार करेल असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सोबतच महायुती २०० चा आकडा पार करेल असा दावाही त्यांनी केला आहे. राऊत पुढे म्हणाले की महायुती २०० च्या वर जाणार हे सांगायला कोणत्याही पोल किंवा ज्योतिषाची गरज नाही.

आम्ही राज्यात १२४ जागा लढत असून प्रत्येक जागा ही जिंकण्यासाठीच असते असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “२०१४ साली कोणतीही युती नसताना आम्ही निवडणूक लढली होती. ‘तुझं माझं जमेना तुझ्याविना करमेना’ ही म्हण राजकारणात योग्य ठरते. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाला एकमेकांशिवाय पर्याय उरलेला नाही. शिवसेनेशिवाय भाजपा सत्तेत येवूच शकणार राज्य करु शकत नाही. भाजपाला जास्त जागा मिळतील हे मान्य करायला काही करत नाही. पण जागा जास्त मिळाल्या तरी तरी महाराष्ट्रात शिवसेनेचं महत्त्व कमी होणार नाही असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.

भाजपला बहुमत मिळाल्यास काय कराल असे राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले की, युतीला बहुमत मिळेल असं सावध उत्तर राऊत यांनी दिलं. भाजपला चांगल्या जागा मिळतील. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना शंभरहून अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यापेक्षा जास्त मिळाव्या असा त्यांचा प्रयत्न करणार आहेत. शेवटी सत्ताधाऱ्यांकडं जी काही साधनं असतात त्याचा फायदा मिळतोच, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

पॅन कार्ड, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाही

पॅन कार्ड, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाही
बँक खाते, पॅन कार्ड आणि जमिनिच्या कागदपत्रांनी नागरिकता सिद्ध होऊ शकत नाही. विदेशी ...

'realme' भारतात पहिला 5G स्मार्टफोन आणणार

'realme' भारतात पहिला 5G स्मार्टफोन आणणार
स्मार्टफोन कंपनी 'realme' भारतात पहिला 5G स्मार्टफोन येत्या २४ फेब्रुवारी रोजी लॉन्च करत ...

सचिन तेंडुलकर यांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली

सचिन तेंडुलकर यांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी होत असून जगभरातून ...

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली

अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची जाहीर माफी मागितली
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांनी बच्‍चन कुटुंबाची सोशल मीडियावरून जाहीर माफी ...

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात फिरायला चला
उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या ७८ उन्हाळी विशेष रेल्वे ...