शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (09:39 IST)

महात्मा गांधींच्या दीर्घायुषी आणि निरोगी आरोग्याचे रहस्य जाणून घ्या

आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तब्येत सुदृढ होती. त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्य बद्दल जाणून घेऊया.
 
1 शाकाहारी आहार आणि व्यायाम - 
शाकाहार आणि नियमानं व्यायाम करणं हे महात्मा गांधींच्या निरोगी आरोग्याचे गुपित होते. गांधीजींच्या उत्तम आरोग्याचं श्रेय त्यांचा शाकाहारी आहार घेणं आणि मोकळ्या हवेत व्यायाम करणे होते. 
 
2 पायी चालणं - 
महात्मा गांधी आपल्या आयुष्यात दररोज 18 किलोमीटर पायी चालत होते. जे त्यांच्या जीवनकाळात पृथ्वीच्या 2 फेऱ्या मारण्या इतक्या होत्या. लंडनमध्ये असताना विद्यार्थी असलेले गांधी दररोज संध्याकाळी सुमारे आठ मैल पायी चालत होते आणि झोपण्यापूर्वी 30- 40 मिनिटे पुन्हा फिरायला जात असे.
 
3 घरगुती उपचार आणि निसर्गोपचार -
 
त्यांच्या मतानुसार लहानपणी आईच्या दुधाचे सेवन केल्यावर दैनिक आहारात दुधाची गरज भासण्याचे कामच नाही. त्यांनी गाय किंवा म्हशीचं दूध न पिण्याचे प्रण घेतले होते ज्याने घरगुती उपचार आणि निसर्गोपचारावर त्यांचा विश्वास दर्शवतात. ते नेहमी आपल्या पोटाची उष्णता कमी करण्यासाठी त्यावर एक ओल्या मातीच्या पट्ट्या बांधत होते. एका सुती कपड्यात ओली काळी मातीला गुंडाळून पोटावर ठेवत होते.
 
4 गीता अनुसरणं - 
 
असे म्हणतात की रोग सर्वात आधी मन आणि मेंदूत येतं आणि त्यामधील सकारात्मक विचार रोग उद्भवू देतं नाही. महात्मा गांधी यांना भगवान महावीर, महात्मा बुद्ध, भगवान श्रीकृष्ण आवडत असे. त्यांच्याकडे नेहमीच गीता असायची. महात्मा गांधी महावीर स्वामी यांचा पंचमहाव्रत, महात्मा बुद्धांचे अष्टांगिक मार्ग, योगाचे यम आणि नियम आणि गीताचे कर्मयोग, सांख्ययोग, अपरिग्रह, आणि समभाव, भावासह त्याच्या दर्शनावर विश्वास करायचे. आणि हे मानसिक स्थितीला सुदृढ करण्यासाठी गरजेचं होतं, ज्यामुळे त्यांचे शरीर स्वच्छ, शांत आणि निरोगी राहत होते.