गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

सुंदर दिसण्यासाठी सोपे घरगुती उपाय!

गव्हाचा कोंडा :
गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहऱ्यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो.

तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घ्यावे. 
एक चमचा मध.
एक चमचा काकडीचा रस
एक चमचा संत्र्याचा रस.
हे सर्व मिक्स करुन चेहऱ्याला लावणे. १५-२० मिनिट लावणे. याचा क्रिम म्हणून उपयोग होतो.

जायफळ पाण्यत उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे.

टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डग व वर्तुळे कमी होतात.

WD
पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळुन जाडसर भार चेहऱ्यावर देणे.

टोमॅटोच्या आतील गर स्मॅश करुन चेहऱ्यावर लावणे. चेहऱ्यावर चमक येते व चेहरा निखरतो.

चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.

चेहऱ्यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे.
WD
सर्दी खोकला असेल तर नेपाली अमृता काढा दिवसातून दोनदा, ३ दिवस घेणे.

उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून रक्षण करण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्याला लावून बाहेर पडणे.

केस गळत असेल तर जास्वंद जेलने केसांची मसाज करणे.

कोरफड जेलने केसांची मसाज केल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना चमक येतो.