मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017 (17:10 IST)

मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशच्या वतीने दोन दिवसीय चक्काजाम

जीएसटीमधील काही धोरण, डिझेल दरवाढ आणि आरटीओचा भ्रष्टाचार  हे प्रमुख मुद्दे समोर करत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने 9 व 10 ऑक्टोबरला देशव्यापी चक्काजाम आंदोलन करणार आहे. यामध्ये सर्वात मोठ्या असलेल्या  मुंबईतील वाहतुकदारांच्या बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने यात सहभाग नोंदवला आहे.  राष्ट्रीय स्तरावर हे चक्काजाम आंदोलन 9 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार  आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बीजीटीएचे प्रवक्ते महेंद्र आर्य यांनी चक्काजाम आंदोलनाची माहिती दिली.

पत्रकार परिषदेत महेंद्र आर्य म्हणाले की,  आम्ही सरकारच्या जीएसटीमधील काही धोरणांचा प्रतिकूल परिणाम होताना  मालवाहतुकीवर दिसत आहे. यामध्ये  मालमत्तेच्या विक्रीवरही सरकार जीएसटी आकारत आहे. त्यामुळे सरकारला दुप्पट जीएसटी मिळत असून वाहतूकदारांचे मोठे  नुकसान होत आहे.