शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (10:33 IST)

Bank Holiday : बँका सप्टेंबरमध्ये 12 दिवस बंद राहतील, सुट्ट्यांची यादी तपासा

आता नवीन महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे सप्टेंबरला काही दिवस शिल्लक आहेत.जर आपल्याला या नवीन महिन्यात बँकिंग संबंधी काम करायचे असेल तर त्यापूर्वी बँकेची सुट्टीची यादी तपासा.यावर आधारित आपण आपले नियोजन करू शकता.सप्टेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील हे जाणून घ्या. 
 
 रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या यादीनुसार 8,9,10,11,17,20,21 सप्टेंबर रोजी देशातील विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील. 8 सप्टेंबर ही श्रीमंत शंकरदेव यांची तिथी आहे.तर,हरतालिका तृतिया 9 सप्टेंबर रोजी आहे.10 आणि 11 सप्टेंबर बद्दल बोलायचे झाले तर गणेश चतुर्थी मुळे वेगवेगळ्या राज्यांत बँका बंद आहेत.17 सप्टेंबरला कर्मपूजा, 20 सप्टेंबरला इंद्रजत्रा आणि 21 सप्टेंबरला श्री नारायण गुरु समाधी दिन असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.याशिवाय 5,12,19,26 सप्टेंबर रविवार आहे.हा दिवस साप्ताहिक सुट्टीचा आहे.याशिवाय 25 सप्टेंबर महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. 
 
या सुट्टीची यादी पाहिली तर सप्टेंबर महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद असणार.तथापि,या सुट्ट्या सणाच्या आधारावर उपलब्ध असतील.हे लक्षात असू द्या की हे सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाही.ज्या राज्यात या बँक आहे त्या राज्याची मान्यतानुसार.या सुट्ट्या त्या -त्या सणाच्या आधारावर उपलब्ध आहेत, 
 
तथापि, या काळात ऑनलाइन बँकिंगच्या कामकाजावर परिणाम होणार नाही. याचा अर्थ असा आहे की, ग्राहकांना डिजिटल बँकिंगमध्ये कोणत्याही समस्येला सामोरी  जावे लागणार नाही.