RBI ची डिजिटल करन्सी येणार ; शक्तिकांत दास
भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या डिजिटल चलनावर बऱ्याच काळापासून काम करत आहे. सीएनबीसीशी बोलताना गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, डिसेंबर 2021 पर्यंत आरबीआय आपल्या डिजिटल चलनासाठी चाचणी कार्यक्रम सुरू करू शकते. जगभरातील केंद्रीय बँका या दिशेने काम करत आहेत. चीन, युरोप आणि यूकेची सेंट्रल बँक क्रिप्टोकरन्सीच्या व्यावसायिक आणि सार्वजनिक वापरासाठी शक्यतांवर विचार करीत आहे. (RBIs own cryptocurrency may come by December, Governor Shaktikant Dass big statement) कोणत्याही केंद्रीय बँकेने जारी केलेल्या डिजिटल चलन किंवा क्रिप्टोकरन्सीला CBDC (central bank digital currencies) असे नाव देण्यात आले आहे. या चलनाला पूर्ण कायदेशीर मान्यता असेल. सध्याच्या फिएट चलनाची ही डिजिटल आवृत्ती असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपण सीबीडीसीबद्दल खूप सावध आहोत, कारण ती पूर्णपणे नवीन संकल्पना आहे, शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.