1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (15:32 IST)

मर्सिडिज-बेंझ आणत आहे जीएलबी एसयूव्ही, जाणून घ्या किंमत

मर्सिडिज-बेंझने जीएलबी एसयूव्हीच्या संकल्पनेतून पडदा उचलला आहे. त्याच्या मर्सिडिज कारच्या रेंजमध्ये त्याचे प्रॉडक्शन मॉडेलला जीएलए आणि जीएलसी दरम्यान ठेवले जाईल. अहवालानुसार जीएलए आणि जीएलसी, एसयूव्ही पेक्षा अधिक क्रॉसओवर कार दिसते. तिथेच जीएलबी बॉक्सी म्हणजे प्रचंड वजनी एसयूव्ही
असेल.
 
जीएलबीची लांबी जीएलसीपेक्षा 22 मिलिमीटर कमी आहे आणि व्हीलबेस देखील 44 मि.मी. लहान आहे. रुंदीच्या बाबतीत हे जीएलसी समतुल्य आहे, जेव्हा की उंचीच्या बाबतीत ही जीएलसी पेक्षा 261 मिमी जास्त उंच जास्त आहे. जीएलबीच्या प्रोटोटाइप मॉडेलला गेल्या वर्षी तपासणी दरम्यान पाहिले गेले होते. यात 17-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहे. त्याच्या प्रॉडक्शन मॉडेल मध्ये 18 इंची अलॉय व्हील दिले जाऊ शकतात.
 
* इंटीरियर - ही 7 सीटर एसयूव्ही कॉन्सेप्ट आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये, मर्सिडिज पहिल्यांदा तीन रो असणारी कार सादर करेल. मॉडेलच्या मागील सीटवर चांगले हेडरूम दिले देण्यात आले आहे. कारच्या सीट बेसने जास्त प्रभावित केले नाही. स्पेस फ्रंटवर जीएलबी एक चांगली फॅमिली कार ठरेल. या मॉडेलमध्ये ब्राउन फिनिशिंग इंटीरियर पाहण्यात आले आहे. यात विस्तृत टचस्क्रीन असलेली मर्सिडिज एमबीयूएक्स इन्फोटमेंट प्रणाली दिली गेली आहे.
 
* इंजिन - मर्सिडिज-बेंझने जीएलबी इंजिन संबंधित माहिती शेअर नाही केली आहे. कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये 2.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. त्याला एम-260 कोडनेम देण्यात आले आहे. हा इंजिन 224 पीएस पावर आणि 350 एनएम टॉर्कची निर्मिती करण्यास सक्षम आहे. इंजिन 8-स्पीड ड्युअल क्लच गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे. यात कंपनीची 4 मेटलिक अॅल-व्हील ड्राइव्ह प्रणाली देखील आहे. अशी अपेक्षा आहे की जीएलबी प्रॉडक्शन मॉडेलमध्ये डिझेल आणि हायब्रीडसह काही इतर इंजिन पर्याय देखील दिले जाऊ शकतात.
 
* लॉन्च आणि किंमत - मर्सिडिजने भारतात जीएलबी लॉन्च करण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. अशी अपेक्षा आहे की कंपनी 2020 पर्यंत ही कार भारतीय बाजारात सादर करू शकते. जीएलए आणि जीएलसी यांच्यात जीएलबीची पोझिशन राहणार आहे. या दोन्ही कारची किंमत रेंज अनुक्रमे 34.38 ते 38.64 लाख आणि 56.16 ते 56.56 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. जीएलबीची किंमत जीएलए पेक्षा जास्त आणि जीएलसी पेक्षा कमी असेल.