बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (16:24 IST)

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत

देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी दूर केल्या आहेत आणि ते पुन्हा कार्यान्वित केले आहेत. सीएनबीसीटीव्ही-18 ने 30 ऑक्टोबरच्या अहवालात हे सांगितले.
 
चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की आयटी ई-फायलिंग पोर्टलने योग्य प्रकारे काम करण्यास सुरुवात केली आहे आणि 90 टक्क्यांपर्यंत त्रुटी सुधारल्या आहेत. करदाते रिटर्न भरणे सुरू करू शकतात, इन्फोसिस उर्वरित विसंगती सुधारण्यासाठी काम करत आहे आणि ते 10-15 दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
 
मात्र, चार्टर्ड अकाउंटंट याला सहमत नसून पोर्टल अजूनही नीट काम करत नसल्याचे सांगतात. ते म्हणाले की वापरकर्त्यांना त्यांचा ओटीपी मिळत नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर एका सीएने सांगितले की, अजूनही अनेक विसंगती आहेत.
 
इन्फोसिसला 2019 मध्ये करार मिळाला होता
इन्फोसिसला 2019 मध्ये पुढील पिढीची आयकर भरण्याची प्रणाली विकसित करण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. रिटर्न छाननीची वेळ ६३ दिवसांवरून एका दिवसावर आणणे आणि रिफंड प्रक्रियेला गती देणे हा यामागील उद्देश होता.
 
७ जून रोजी नवीन पोर्टल सुरू झाले
नवीन आयकर पोर्टल www.incometax.gov.in (www.incometax.gov.in) 7 जून रोजी मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. इन्फोसिसने ही नवी वेबसाइट तयार केली आहे.