शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (23:33 IST)

Jio Platformsचा निव्वळ नफा 3728 कोटी रुपयांवर पोहोचला

चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत जिओ प्लॅटफॉर्मचा एकत्रित निव्वळ नफा 23.48 टक्क्यांनी वाढून 3,728 कोटी रुपये झाला आहे. जिओ प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लि. (आरआयएल) ने शुक्रवारी एका निवेदनात ही माहिती दिली.
 
आरआयएलच्या जिओ प्लॅटफॉर्म युनिटमध्ये टेलिकॉम कंपनी जिओ आणि अॅपचा समावेश आहे. यापूर्वी, आर्थिक वर्ष 2020-21 च्या याच तिमाहीत कंपनीला 3,019 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न जवळपास सात टक्क्यांनी वाढून 23,222 कोटी रुपये झाले आहे, जे एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत 21,708 कोटी रुपये होते.
 
'इंटरकनेक्ट' वापर शुल्काच्या समायोजनासह, जिओ प्लॅटफॉर्मचे एकूण उत्पन्न चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 15.2 टक्क्यांनी वाढून 23,222 कोटी रुपये झाले.