रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2023 (15:39 IST)

Driverless Cars देशात ड्रायव्हरशिवाय कार चालणार नाही, नितिन गडकरींनी सांगितले कारण

nitin gadkari
Driverless Cars देशात चालाकाशिवाय अर्थात ड्रायव्हरलेस कार चालणार नाहीत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी एकदा पुन्हा ड्रायव्हरशिवाय कार बद्दल विरोध दर्शवला आहे. त्यांनी म्हटले की मी परिवहन मंत्री असेपर्यंत आपण ड्रायव्हरलेस कार चालण्याची गोष्ट विसरुन जा. यामागील कारण देखील स्पष्ट केले आहे.
 
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी एका कार्यक्रमात म्हटले की मी देशात चालकाशिवाय वाहन चालवण्याची परवानगी देणा नाही. यामुळे अनेकांना नुकसान होऊ शकतं. जे लोक ड्रायव्हिंगच्या व्यवसायात आहेत त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील, म्हणून मी हे कधीही करणार नाही. ते पुढे म्हणाले की, यावर मला अनेकदा प्रश्न विचारण्यात आले आणि प्रत्येक वेळी मी परिवहन मंत्री असल्याने हे शक्य नसल्याचे सांगितले.
 
जाणून घ्या नितीन गडकरी टेस्लाबद्दल काय म्हणाले
अमेरिकास्थित ईव्ही उत्पादक टेस्ला भारतातही आपले पाय रोवायचे आहे. यासाठी त्यांनी भारतातून आयात करात सूट देण्याची मागणी केली आहे. याबाबत नितीन गडकरी म्हणाले की, टेस्ला कंपनीचे भारतात स्वागत आहे, मात्र कार भारतातच बनवायला हव्यात. चीनकडून आयात होणार नाही. ते म्हणाले की टेस्लाला चीनमध्ये उत्पादन करणे आणि नंतर भारतात आयात करणे शक्य नाही.
 
भारत सरकारने ड्रायव्हरलेस कारबाबत आपले मत स्पष्ट केले
अनेक मोठ्या कार उत्पादक कंपन्या ड्रायव्हरलेस कारवर काम करत आहेत. अनेक देशांमध्ये याबाबतच्या चाचण्याही सुरू आहेत. आता या कंपन्या त्यांच्या ड्रायव्हरलेस कार लाँच करण्याच्या विचारात आहेत, मात्र भारतात हे शक्य होणार नाही. भारत सरकारने ड्रायव्हरलेस कारबाबत आपले मत स्पष्ट केले आहे.