बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (19:44 IST)

नोटबंदीमुळे देशात भीषण बेरोजगारी, एनएसएसओ आला अहवाल

नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाला भीषण बेरोजगारीचा सामना देशाला करावा लागला आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसच्या (एनएसएसओ) ताज्या आकडेवारीनुसार देशात बेरोजगारीचा दर तब्बल ६.१ टक्क्यांच्या घरात गेला आहे. हा आकडा गेल्या ४५ वर्षातील सर्वांत भीषण दाहकता दाखवणारा आहे. यापूर्वी १९७२-७३ च्या वर्षात बेरोजगारी ६ टक्क्यांच्या वर गेली होती. विशेष म्हणजे नोटबंदीनंतर या आकड्यांमध्ये सर्वांधिक वाढ झाली आहे. 
 

या अहवालामध्ये २०१७ ते जून २०१८ पर्यंत आकडेवारीचा विचार करण्यात आला आहे. या अहवालामध्ये नोटबंदीमुळे लोकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. शहरी क्षेत्रात बेरोजगारी ७.८ टक्क्यांच्या घरात गेली आहे, तर ग्रामीण भागात हाच आकडा ५.३ टक्क्यांपर्यंत आहे. २०१७-१८ मध्ये युवकांच्या बेरोजगारीमध्ये न भुतो न भविष्यती वाढ झाली आहे. ग्रामीण क्षेत्रातील शिक्षित महिलांची बेरोजगारी दर वाढून १७.३ टक्के झाला आहे. यापूर्वी २००४-०५ पासून २०१२ पर्यंत ग्रामीण क्षेत्रात महिला बेरोजगारी दर ९.७ टक्क्यांपासून ते १५.२ टक्क्यांच्या आसपास होता. ग्रामीण क्षेत्रातील शिक्षित पुरुष बेरोजगारी दर १०.५ टक्के आहे. २००४-०५ पासून ते २०१२ पर्यत हा आकडा ३.५ ते ४.४ टक्क्यांपर्यंत होता.