गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (10:34 IST)

PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर खरेदी करणे झाले महाग

नवी दिल्ली. प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) ही भारत सरकारची एक योजना आहे ज्याचे उद्दिष्ट शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे आहे. पण आता दिल्ली-एनसीआरच्या गाझियाबादमध्ये घर खरेदी करणे महाग होईल. गाझियाबादमध्ये पीएम आवास योजनेतील घरांच्या किमतीत दीड लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गाझियाबाद डेव्हलपमेंट अथॉरिटीने (जीडीए) समाजवादी आवास योजना (अर्फोडेबल स्कीम) अंतर्गत घरांच्या किमतीत 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. शनिवारी जीडीए बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.  
 
किती महाग झाली घरे ते जाणून घ्या
या योजनेत घर खरेदी करण्यासाठी अडीच ते चार लाख रुपये जास्त द्यावे लागतील. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांच्या किंमतींमध्येही दीड लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता या योजनेत साडेचार लाख ऐवजी सहा लाख रुपयांना घरे उपलब्ध होतील. उत्तर प्रदेशामधील गाझियाबाद शहरात, गाझियाबाद विकास प्राधिकरणात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत.
 
1056 घरे अद्याप रिक्त आहेत
गाझियाबाद विकास प्राधिकरणाने या योजनेंतर्गत 2067 घरे बांधली असून त्यापैकी 1056 घरे अद्याप रिक्त आहेत. ही रिक्त घरे 'पहले आओ, पहले पाओ'  या योजनेंतर्गत देण्यात येतील. ही उर्वरित घरे नवीन किंमतींसह म्हणजेच दीड लाख रुपयांच्या वाढीसह विकल्या जातील.