गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (13:08 IST)

सॅमसंग टीव्ही उत्पादन भारताबाहेर नेणार

दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगनं टीव्ही उत्पादन भारताबाहेर नेण्याची योजना बनवली आहे. सध्या सॅमसंगच्या चेन्नई यूनिटमधून भारतात टीव्ही बनतात. पण कंपनी आता व्हिएतनाममधून भारतात टीव्ही आयात करेल. बजेटमध्ये टीव्ही पॅनल बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पार्ट्सवर आयात शुल्क वाढवण्यात आलं. यामुळे कंपनी नाराज झाल्याचं बोललं जातंय. बजेटमध्ये टीव्ही पॅनल बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ओपन सेलवर १० टक्के आयात शुल्क वाढवण्यात आलं होतं. पण अनेक कंपन्यांनी विरोध केल्यानंतर हे शुल्क घटवून अर्ध्यावर करण्यात आलं. २०१६-१७ या वर्षामध्ये सॅमसंगला भारतात ८ अरब डॉलरचं महसुली उत्पन्न मिळालं होतं. 
 
दुसरीकडे  या कंपनीनं नोएडामध्ये मोबाईल फोन बनवण्याची क्षमता ६७ लाखांवरून १.२ कोटी युनिट केली आहे. ही जगातली सगळ्यात मोठी मोबाईल फोन बनवणारी कंपनी आहे, असं सॅमसंगचे सीईओ एचसी हॉन्ग यांनी सांगितलं होतं. आम्ही भारतात भारतीयांसाठीच नाही तर जगासाठी मोबाईल बनवत आहोत. आम्ही भारत सरकारच्या नितींसोबत आहोत आणि भारताला मोबाईल फोन निर्यातीचं हब बनवण्याचं स्वप्न असल्याचं कंपनीनं सांगितलं होतं.