शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑगस्ट 2015 (11:01 IST)

कांद्याने काढले डोळ्यातून पाणी

पुणे : अवकाळी पाऊस, गारपिट आणि ऐन पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने याचा परिणाम कांद्यावर झाला असून राज्यात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
 
किरकोळ विक्री ६० रुपये प्रतिकिलो या दरावर गेल्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे.
 
पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. याचा परिणाम कांद्यावर झाला आहे. महाराष्टात प्रचंड उत्पादन होत असल्याने कांद्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पिकावर परिणाम झाल्याने दर वाढले आहेत.
 
बाजार समित्यांमध्येच कांद्याचा भाव ५५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर किरकोळ बाजारात ६० रुपयांच्यावर पोहोचला आहे. दुष्काळ आणि इतर समस्यांशी लढताना दमझाक होत असतानाच आता कांदा सरकारच्याही डोळ्यातून पाणी काढणार, अशी स्थिती आहे.