शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 8 जुलै 2014 (15:57 IST)

रेल्वे बजेटमध्ये मुंबईकरांच्या वाट्याला पुन्हा निराशाच

केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी दुपारी संसदेत यंदाचा रेल्वे बजेट सादर केला. मुंबईत येत्या दोन वर्षात 864 नव्या लोकल धावणार असल्याची घोषणा गौडा यांनी केली. यासोबत अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनची घोषणाही केली. मात्र, नव्या लोकलची घोषणाही जुनीच असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. मागील पंधरवड्यात रेल्वे मंत्रालयाने भाढेवाढ केली मात्र, मुंबईसाठी विशेष कोणतेही घोषणा नसल्याचे दिसून आले होते.

देशभरातील वेगवेगळ्या शहरातून मुंबईसाठी ट्रेन नव्याने सोडल्या जाणार असल्या तरी स्थानिक मुंबईकरांना याचा फारसा फायदा होणार नाही. याउलट बाहेरील राज्यातून येणा-यांनाच याचा फायदा होणार असल्याचे दिसत आहे.

मोदींच्या सरकारने देशातील कोट्यावधी जनतेला 'अच्छे दिन'चा वादा केला होता. त्यानुसार मुंबईकरांना आजच्या रेल्वे अर्थसंकल्पातून यंदा तरी काही पदरात पडणार आहे का याकडे मुंबईतील जनतेचे लक्ष लागले होते. मात्र, मुंबईकरांच्या वाट्याला घोरनिराशा आली आहे.

दरम्यान, मुंबईत दररोज सुमारे 70 ते 75 लाख प्रवाशी प्रवास करतात. तसेच रेल्वेला सुमारे 35 ते 40 टक्के मुंबई शहरातून महसूल मिळतो. त्याप्रमाणात मुंबईकरांना कधीच चांगली सेवा व सुविधा मिळायला हव्या होत्या, अशी खंतही  मुंबईकरांनी बजेटनंतर बोलून दाखवली आहे.