शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2013 (20:27 IST)

साखरेच्या गोळीत कडू घालण्याची तयारी

FILE
सरकारने पेट्रोल व डिझेलनंतर साखर नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे सारखेचे भाव बाजार निर्धारित करेल.

मंत्रिमंडळ समितीने गुरुवारी सायंकाळी या निर्णयास हिरवा कंदील दाखवला असून यानंतर भावांवर सरकारी नियंत्रण राहणार नाही.

परिणाम काय होणार: सरकारच्या या निर्णयानंतर अगोदरच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या जनतेवर आणखी भार पडेल. या निर्णयामुळे लवकरच साखरेची दरवाढ होऊ शकते.

निधी जमवण्याची शक्कल: सरकारचा निर्णय सार्वत्रिक निवडणूकीअगोदर निधी जमवण्याची शक्कल असल्याचे सूर उमटत आहे. कारण या निर्णयाचा सर्वाधिक फायदा साखर कारखानदारांनाच होणार आहे.