मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (12:42 IST)

बिगबॉस मराठी ३ : अभिनेत्री श्रेया बुगडेचा गृह प्रवेश

फोटो साभार -ट्विटर 
झी मराठीवर येणाऱ्या शो 'चला हवा येऊ द्या' मधील आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणारी आणि  प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणारी अभिनेत्री श्रेया बुगडे ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्राम वर आपले एक फोटो शेअर केले आहे .या फोटो मध्ये श्रेयाच्या गळ्यात बिगबॉसच्या लोगो सारखे एक लॉकेट  दिसत आहे. त्यामुळे आता मराठी कलर्स वर प्रसारित होणाऱ्या बिगबॉस मराठी ३ या रियालिटी शो मध्ये बिगबॉसच्या घरात श्रेया बुगडे हिला प्रवेश मिळणार का ? असा प्रश्न तिच्या चहेत्यांना पडला आहे . काही युजर्सने तिला विचारले देखील आहे . मात्र यावर श्रेयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही