शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (12:10 IST)

प्रथमेश आणि मुग्धाचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला

सारेगमप लिटिल चॅम्प्स या शो मुळे लोकप्रियता मिळविणारे दोन स्पर्धक आता खऱ्या आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत जुळले आहे. प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचे लग्न थाटामाटात पार पडले. विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. दोघेही खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहेत.
 
21 डिसेंबर रोजी मुग्धा व प्रथमेश यांनी लग्नगाठ बांधली आहे. गायिका शमिका भिडे आणि रोहित राऊत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. विवाहात मुग्धाने हिरव्या काठांची पिवळी नऊवारी नेसली आहे तर प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता व पुणेरी पगडी घातली आहे. मुग्धा - प्रथमेश यांचे लग्न रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पार पडले. महाराष्ट्राच्या या लाडक्या जोडीवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.