बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 9 जून 2018 (15:39 IST)

न्यूझीलंडचा सलामीवीर रॉब निकोल निवृत्त

न्यूझीलंडचा सलामीवीर रॉब निकोल याने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. त्याने टोप्यांच्या फोटोसह एक ट्विट केले असून त्यात ‘(सगळं) संपलं’असा भावनिक संदेश लिहिला आहे. या फोटोमध्ये ५ टोप्या लटकवलेल्या दिसत असून त्यात एक टोपी न्यूझक्सिलँडच्या संघाचीही आहे. ती टोपी त्याने मध्यभागी ठेवली आहे.
 
३५ वर्षीय रॉबने २२ एकदिवसीय, २१ टी २० आणि २ कसोटी सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने एकूण ९४१ धावा केल्या असून त्यात २ शतकांचा समावेश आहे. तसेच, टी २० क्रिकेटमध्येही त्याने अष्टपैलू खेळाडूची भूमिका उत्तमप्रकारे पार पाडली.