आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस दरवर्षी १५ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कुटुंबाचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून कुटुंबाच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे, त्यांचे एकत्र राहणे, एकमेकांना भावनिक आधार देणे आणि समाजात एकता निर्माण करणे हा या दिवसाचा हेतू आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस साजरा करणे सुरू केले होते. International Family Day हा दरवर्षी कुटुंबांचे महत्त्व आणि समाजातील त्यांच्या भूमिकेचा साजरा करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो.
२०२५ मध्ये याची थीम काय?
२०२५ ची थीम "Family-Oriented Policies for Sustainable Development: Towards the Second World Summit for Social Development" अशी आहे.
जागतिक कौटुंबिक दिवसाचा इतिहास
आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिवसाच्या इतिहासाशी संबंधित विविध तथ्ये आहेत:-
१९८९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या बैठकीत कुटुंबाचे महत्त्व यावर चर्चा झाली आणि एक दिवस या दिवसाचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी समर्पित मानले गेले.
१९९४ मध्ये, युनायटेड नेशन्सने दरवर्षी जागतिक कौटुंबिक दिन म्हणून १५ मे हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
सन १९९४ मध्ये, १५ मे रोजी प्रथमच, जागतिक कौटुंबिक दिन (International Family Day 2025) साजरा केला गेला.
जागतिक कौटुंबिक दिवसाचे महत्त्व
कुटुंब हा समाजाचा पाया आहे. हा दिवस कुटुंबातील प्रेम, आधार आणि एकता यांचे महत्त्व समजावून सांगतो. यामुळे वैयक्तिक विकास, सामाजिक एकता आणि समुदायाची भावना वाढते. तसेच, कुटुंबातील सदस्यांना एकटेपणा जाणवू नये आणि त्यांचे भावनिक नाते दृढ व्हावे, यावर भर दिला जातो.
हा दिवस कसा साजरा करावा?
कुटुंबासोबत वेळ घालवा: कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत एकत्र जेवण, गप्पा किंवा सहल आयोजित करा.
जागरूकता पसरवा: सोशल मीडियावर कुटुंबाचे महत्त्व सांगणारे संदेश शेअर करा.
सामाजिक कार्य: गरजू कुटुंबांना मदत करा, जसे की त्यांना अन्न, कपडे किंवा शिक्षणासाठी सहाय्य द्या.
चर्चासत्रे आणि कार्यक्रम: कुटुंबाच्या महत्त्वावर आधारित कार्यक्रम, वेबिनार किंवा कार्यशाळा आयोजित करा.
कृतज्ञता व्यक्त करा: कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद द्या आणि प्रेम व्यक्त करा.
हा दिवस कुटुंबातील बंध मजबूत करण्याचा आणि त्यांचे महत्त्व जाणून घेण्याचा एक उत्तम अवसर आहे.