मुलींची पसंत : लाकडी दागिने

wooden armament
Last Modified मंगळवार, 21 एप्रिल 2020 (13:14 IST)
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क दागिन्यांसाठीही होऊ लागला. या लाकडी दागिन्यांना तरुण मुलींचीही चांगली पसंती मिळतेय.
लाकडांपासून बनवलेल्या बांगड्या, कानातील, नेकलेस या गोष्टींचा यात समावेश आहे. मोठे, चपटे, गोल, त्रिकोणी आकारातील नेकपीस, बांगड्या, रंगीबेरंगी- लांबलचक माळा, ब्रेसलेट, कानातील कोणत्याही शेड्‌सवर शोभून दिसतात.
विविध रंगांच्या लाकडी बांगड्या हातभर घालणारी एखादी महिला भलताच भाव खाऊन जाते. हे दागिने साधे आणि वेगळेसुध्दा वाटतात. कॉलेजपासून, समारंभातून, ऑफिसर्पंत कुठेही शोभतात. लाकडाचे हे दागिने मॅट तसेच ग्लॉस प्रकारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमतही परवडणसारखी असल्यामुळे दुधात साखरच! दागिन्यांशिवाय लाकडी बेल्ट्‌सनाही तरुणींची पसंती मिळत आहे. स्कर्ट-फ्रॉक आणि जीन्सवरही हे बेल्ट वेगळा लूक देतात.
वजनाला हलके, कुठल्याही अॅजलर्जीची भीती नाही यामुळेया दागिन्यांना खास पसंती आहे. विशेषतः पारंपरिक कपड्यांवर हे दागिने शोभून दिसतात. निळ्या, पिवळ्या, काळ्या, हिरव्यासह वेगवेगळ्या रंगांच्या मिक्स कॉम्बिनेशन्समध्येही उपलब्ध आहेत. अॅगक्सेसरिजचा हा वेगळा प्रकार वापरताना चप्पल, बॅग आणि कपड्याच रंगाचा अंदाज घेऊन त्याला साजेशा रंगाच्या ज्वेलरीची निवड करता येईल.

बांगड्या-लाकडी दागिन्यांवर वेगवेगळ्या रंगांचं पॉलिश करण्यात येतं. विशेषतः यामधल्या रंगीबेरंगी बांगड्या प्रथमदर्शनी काचेच्या असल्यासारख्या भासतात. लाकडी बांगड्यांचा हा पर्याय मस्त आणि ट्रेंडी आहे. पारंपरिक भारतीय नक्षीकाम आणि मण्यांची सजावट केलेल्या बांगड्यांचा सेट कुठल्याही कपड्यांवर उठून दिसतो. चौकोनी, षट्‌कोनी, अष्टकोनी अशा निरनिराळ्या आकार आणि डिझाइन्समधल्या बांगड्या कुठल्याही रंगाची साडी, कुर्ता किंवा अगदी ऑफिसवेअर कपड्यांवरही तितक्याच शोभून दिसतात. त्यामुळेच कॉलेज तरुणींबरोबरच इतर वयोगटातल्या महिलांही त्यांचा वापर करताना दिसतात. या लाकडी बांगड्या 25 ते 150 रुपयांपर्यंत मिळतात. त्यावरचं डिझाईन आणि नक्षीकाम यावर त्यांची किंमत अवलंबून असते.

ब्रेसलेट आणि नेकलेस लाकडाचा वापर करून बनवलेले ब्रेसलेट्‌सही बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जातात. यासोबतच लाकडी नेकलेस घालणचा ट्रेंडही कॉलेज तरुणींमध्ये दिसून येतोय. प्रामख्याने हे नेक पीस कुर्ता किंवा साडीला आणखीन क्लासिक लूक देतात. यामध्ये विशेषतः एकरंगी लाकडी मणी तसेच लांबट चौकोनी किंवा लांबट गोलाकार, त्रिकोणी चकत्यांचा वापर केला जातो. हे नेकलेस शक्यतो ब्राऊन किंवा काळसर रंगात असल्याने ते कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर शोभून दिसतात. तसेच टीशर्टवर लाकडी नेकलेसऐवजी चेनमध्ये एखाद्या रंगीत पेंडन्टचा वापर करू शकता.


यावर अधिक वाचा :

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली
उत्तर प्रदेश येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी शिजवून खाल्ल्याचा विचित्र ...

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ...

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स फीचर युजर्ससाठी रोलआउट

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स  फीचर  युजर्ससाठी रोलआउट
फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स या हे फीचर कंपनीने युजर्ससाठी ...

फेसबुकचे नवे मजेशीर फीचर 'Avatars’

फेसबुकचे नवे  मजेशीर फीचर  'Avatars’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स ...

कान दुखत आहे ? तर लसणाचे हे 5 उपाय करून बघा

कान दुखत आहे ? तर लसणाचे हे 5 उपाय करून बघा
कानात मळ साचणे, सर्दीमुळे कान दुखणे किंवा कोणत्याही प्रकाराचे एलर्जी किंवा संसर्ग होणं ही ...

नेटवर्किंग चांगले ठेवण्यासाठी...

नेटवर्किंग चांगले ठेवण्यासाठी...
जर आपण कामाच्या ठिकाणी सहकार्यां बरोबर चांगले नेटवर्क तयार केले तर आपल्याला व्यावसयिक ...

हृदयविकार टायाळचा असेल तर आठवड्यात १२ अंडी खा

हृदयविकार टायाळचा असेल तर आठवड्यात १२ अंडी खा
अंड्यामध्ये प्रथिने आणि पोषक घटक अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे अंडे हे आरोग्यास उत्तम ...

जांभळाचे फायदे आपल्याला माहित आहेत का?

जांभळाचे फायदे आपल्याला माहित आहेत का?
जांभळाच वैज्ञानिक नाव सिजीगियम क्युमिनी आहे. जांभूळ हे अम्लीय प्रकृतीचं फळ आहे. पण चवीला ...

Flax Seed For Hair : केसांसाठी जवसाचे 5 सर्वोत्तम फायदे

Flax Seed For Hair : केसांसाठी जवसाचे 5 सर्वोत्तम फायदे
जवसाचे वापर कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि सौंदर्यासाठी करतात. पण ही जवस ...