शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

गंगा सप्तमी कथा, पूजा, मंत्र आणि महत्व

ganga saptami katha
पौराणिक शास्त्रांप्रमाणे वैशाख शुक्ल सप्तमी तिथीला आई गंगा स्वर्ग लोकातून शिवशंकराच्या जटांमध्ये पोहचली होती. म्हणून या ‍दिवशी गंगा सप्तमी साजरी केली जाते.  ज्यादिवशी गंगाची उत्पत्ती झाली त्या दिवशी गंगा जयंती आणि ज्या दिवशी गंगा पृथ्वीवर अवतरित झाली त्यादिवशी गंगा दशहरा साजरा केला जातो. या दिवशी गंगा पूजन केलं जातं. 
 
महत्व- गंगा सप्तमीला गंगा नदीत स्नान केल्याने पाप नाहीसे होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले गेले आहे. गंगा स्नानाचे आपले महत्त्व आहेच तरी या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व दु:खापासून मुक्ती मिळते. या दिवशी गंगा मंदिरांसह इतर मंदिरात देखील या निमित्ताने पूजा केली जाते. गंगा नदीत स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते. तसेच या दिवशी दान-पुण्याचं विशेष महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. 
 
पूजा विधी-
* जर गंगा मैयामध्ये स्नान करणे शक्य नसेल तर गंगाच्या पाण्याचे काही थेंब सामान्य पाण्यात मिसळून स्नान करावे.
 
* आंघोळ झाल्यावर आपण गंगा मैयाच्या मूर्तीची पूजा करू शकता.
 
* या दिवशी भगवान शिव यांची पूजा देखील शुभ मानली जाते.
 
* त्याशिवाय गंगेला आपल्या तपामुळे पृथ्वीवर आणणार्‍या भगीरथाची पूजादेखील करावी.
 
* गंगा पूजनासह दान-पुण्य केल्याने देखील फळ प्राप्ती होते.
 
तसे, अनेक पौराणिक कथा गंगा नदीशी संबंधित आहेत, जी गंगेचं संपूर्ण अर्थ परिभाषित करते. गंगा नदी हिंदूंच्या श्रद्धेचे स्थान आहे आणि अनेक धर्म ग्रंथांमध्ये गंगेचं महत्त्व बघायला मिळतं.
 
मंत्र- 'ॐ नमो भगवति हिलि हिलि मिलि मिलि गंगे माँ पावय पावय स्वाहा'
हा गंगेचं सर्वात पवित्र मंत्र आहे.
 
कथा- भागीरथ एक प्रतापी राजा होते. त्यांनी आपल्या पूर्वजांना जीवन-मरण या दोषापासून मुक्त करण्यासाठी गंगेला पृथ्वीवर आणण्याचा निश्चय केला. त्यांनी कठोर तपस्या केली. तपस्येला प्रसन्न होऊन गंगा स्वर्गाहून पृथ्वीवर येण्यास तयार झाली. परंतु त्यांनी भागीरथांना म्हटले की जर त्या स्वर्गातून सरळ पृथ्वीवर आल्या तर त्यांचा वेग पृथ्वी सहन करु शकणार नाही आणि पाताळात जाईल.
 
हे ऐकून भागीरथ विचारात सापडला. गंगेला अभिमानहोतं की कोणीही तिचं वेग सहन करु शकणार नाही. तेव्हा त्यांनी महादेवांची उपासना सुरु केली. संसाराचे दु:ख हरण करणारे शिव शंभू प्रसन्न झाले आणि भागीरथाला वर मागण्यास सांगितले. भागीरथाने आपल्या मनाची इच्छा सांगितली.
 
गंगा जशीच स्वर्गातून पृथ्वीकडे वळू लागी गंगेचं गर्व दूर करण्यासाठी शंकरांनी आपल्या जटांमध्ये त्यांनी कैद केलं. यावर त्यांनी शंकराकडे माफी मागितली तेव्हा शिवजीने आपल्या जटांच्या एक लहानश्या पोखरमध्ये त्यांना सोडलं तेथून गंगा सात धारांमध्ये प्रवाहित होऊ लागली. या प्रकारे भागीरथ पृथ्वीवर गंगा वरण करुन भाग्यवान झाले. त्यांनी आपल्या पुण्याईमुळे जनतेला उपकृत केले. 
 
युगानुयुगापासून वाहणारी गंगा महाराज भगीरथ यांच्या कष्टमयी साधनेची कहाणी सांगते. गंगा प्राण्यांना केवळ जीवनदान नव्हे तर मुक्ती देखील देते.