भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने..

Shriram Bhikaji Velankar
Last Modified गुरूवार, 22 जुलै 2021 (09:16 IST)
आता तुम्ही सगळ्यांनी पिन कोड तर पाह्यलाच असेल. पाह्यला असेल काय, कित्येकदा लिहिला पण असेलच की हो. पण कधी विचार केलाय, ही भानगड कशी आणि का अस्तित्वात आली याचा? किंवा याच्या मागं नक्की कुणाचं सुपीक डोकं असेल याचा? ही आयडियाची कल्पना आहे
श्रीराम वेलणकर या मराठमोळ्या माणसाची. यांनीच पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिलीय बरं...

म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर्. हे घडलं १९७२मध्ये. तोपर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांचि विभागवार विभागणि व्हायची. पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाचि गावं, कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे, आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा!!
चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच. हे सगळं टाळण्यासाठी विभागवार पत्रांची विभागणी करण्यासाठी ही पिनकोड पद्धत अंमलात आणण्यात आली.

पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिन कोड’ प्रणालीचे नक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं.

पिनकोडची रचना अशी आहे.
पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो.

आता पाहूयात हा पिनकोड वाचायचा कसा..

यातले पहिले दोन अंक पोस्टऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल
११ - दिल्ली

१२ व १३ - हरयाणा

१४
ते १६ - पंजाब

१७ - हिमाचल प्रदेश

१८ ते १९ जम्मू आणि काश्मिर
२० ते २८ - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड

३० ते ३४ - राजस्थान

३६ ते ३९ - गुजरात

४० ते ४४ - महाराष्ट्र

४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड

५० ते ५३ - आंध्र प्रदेश

५६ ते ५९ - कर्नाटक

६० ते ६४ - तामिळनाडू

६७ ते ६९ - केरळ

७० ते ७४ - पश्चिम बंगाल

५५ ते ७७ - ओरिसा

७८ - आसाम

७९ - पूर्वांचल

८० ते ८५ बिहार आणि झारखंड

९० ते ९९ - आर्मी पोस्टल सर्व्हिस

म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक - सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो. उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक - ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.
आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही. ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकरांना मानाचा मुजरा...!

श्रीराम भिकाजी वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते. आज दुर्देवाने या श्रीराम भिकाजी वेलणकर यांच्या बद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे.यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

इंटरनॅशनल टायगर डे विशेष

इंटरनॅशनल टायगर डे विशेष
इंटरनॅशनल टायगर डे विशेष एक शानदार, उमदा जीव आहे तो, जंगलाची सम्पूर्ण शान आहे तो,

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ मार्फत घेण्यात ...

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’ मार्फत घेण्यात येणाऱ्या एम.फील/ पीएच.डीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन अधिछात्रवृत्ती २०२१ चा त्वरीत लाभ घेण्याचे आवाहन
“छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF २०२०) करिता सन २०२०-२१ मध्ये ...

पुरण सैल झाले तर काय करावे

पुरण सैल झाले तर काय करावे
चण्याची डाळ जास्त वेळा चोळून धुवू नये. डाळ शिजवण्यापूर्वी दोन तास भिजत ठेवावी. कुकरमधून ...

श्रावणमध्ये या 5 वस्तूंचे सेवन करा, भरपूर ऊर्जा मिळेल

श्रावणमध्ये या 5 वस्तूंचे सेवन करा, भरपूर ऊर्जा मिळेल
पावसाळ्यात इतर हंगामाच्या तुलनेत पाचक प्रणाली कमकुवत होते. अशात उपवास करत असणार्‍यांनी ...

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी या प्रकारे दूर करा

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी या प्रकारे दूर करा
पावसाळा आपल्या पसंत असला तरी या हंगाम्याची सर्वात वाईट बाब म्हणजे कपड्यांना येणारी ...