जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे साजरा केला आणि संगीताचे महत्व काय आहे?

Last Modified रविवार, 20 जून 2021 (17:48 IST)
दर वर्षी 21 जून रोजी दिवस साजरा केला जातो.याला फेटे डी ला म्युझिक असे ही म्हणतात.याचा अर्थ आहे संगीत महोत्सव.
फ्रान्समध्ये 1982 पासून हा दिवस साजरा करण्याची सुरूवात झाली होती. यानंतर, दरवर्षी सुमारे 17 देशांमध्ये संगीत साजरा केला जातो. या मध्ये भारत देशाचा देखील समावेश आहे.
संगीत दिन साजरा करण्याचा उपक्रम 1976 मध्ये माजी अमेरिकन जोएल कोहेन यांनी सुरू केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, लक्झेंबर्ग,जर्मनी, इस्त्राईल,चीन,पाकिस्तान,मोरोक्को,स्वित्झर्लंड, कोस्टारिका,लेबेनॉन, मलेशिया, रोमानिया, कोलंबिया आणि फिलिपाईन्स आहे.वेग वेगळ्या देशात हा दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.कुठे संगीताची मैफिल असते तर कुठे ईडीएम नाईट,तर कुठे संगीत स्पर्धा आयोजित करण्यात येते.
भारतातील हे शहर संगीताचे शहर आहे-

उत्तर प्रदेशात स्थित वाराणसीची स्वतःची एक कथा आहे. ज्याला धर्म आणि संगीताची भूमी असे म्हणतात. युनेस्कोने भारताच्या वाराणसीच्या भूमीला 'संगीताचा शहर ' म्हणून घोषित केले.आहे.या शहरातून अनेक तारकांनी जन्म घेतला आहे ज्यांनी संगीताला एक नवीन ओळख दिली आहे.पंडित,रविशंकर,शहनाई तज्ज्ञ बिस्मिल्ला खान,गिरीजा देवी,यांच्या सह अनेक संगीतकाराचा जन्म इथे झाला आहे.
संगीत आणि जीवन

संगीत आणि जीवन हे दोन्ही भिन्न आहेत परंतु एकमेकांना पूर्ण करतात .बर्‍याचदा जेव्हा आपल्या मनात काय असते हे कोणालाही समजत नाही, तेव्हा आपल्याला
त्याचे सार संगीतात मिळते. आणि जेव्हा संगीतामध्ये ते सार नसते तेव्हा एखादी व्यक्ती ती गोष्ट संगीतातून सांगून जाते.इंग्रजीत एक म्हण आहे की ‘माय प्ले लिस्ट अंडरस्टेंड मी बेटर देन अदर्स’म्हणजे माझी प्लेलिस्ट मला इतरांपेक्षा जास्त चांगलं ओळखते.
संगीत एक भावना आहे एक अनुभव आहे,ज्याला ऐकून प्रत्येकजण आनंदित होतो.बऱ्याचदा लोकांना एकाकीपणा अस्वस्थता जाणवत असल्यास ते एकटे बसून संगीत ऐकणे पसंत करतात.संगीत ऐकून त्यांना हलकं वाटतं.
आजच्या काळात, व्यक्तीच्या मनःस्थितीनुसार संगीताच्या अनेक झोनर आहे ज्यांना चालवून माणसाला त्याचे मूड कसे आहे लक्षात येत.संगीत आणि आरोग्याचे जवळचे संबंध आहे.माणूस जेव्हा संगीत ऐकतो तेव्हा त्याच्या शरीरात संवेदनशील लहरी वाहतात.मन हलकं होऊन आंनद होऊ लागतो.बऱ्याच वेळा तर काही काही गाणी किंवा संगीत ऐकल्यावर डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.

मानसशास्त्रज्ञांच्या मते,संगीत आणि आरोग्याचे खोल संबंध आहे.वैज्ञानिक क्षेत्रात संगीत आणि आरोग्यावर संशोधन सुरु आहे.प्राचीन काळापासून संगीत आणि आरोग्याला महत्त्व आहे.आरोग्यावर त्याचा होणारा परिणाम बघितल्यावर त्याला संगीत थेरेपी असे म्हणतात.
आजच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात,तणाव आणि सगळी कडे होणाऱ्या आवाजामुळे मन अस्वस्थ होते.त्या मनाला शांत करण्यासाठी व्यक्ती संगीत ऐकणे पसंत करत.मग ते स्लो म्युझिक असो,गझल असो,किंवा शास्त्रीय संगीत असो.म्हणून संगीताला म्युझिक थेरेपी देखील म्हणतात.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत कमी होणार नाही
मैत्री हे असे नाते असते जेव्हा कुटुंबात कोणी नसते, तर मित्र म्हणजे दुसरे कुटुंब असते. सुख ...

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात
गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप ...

फूल पाखरा

फूल पाखरा
फूल पाखरा, फूल पाखरा नको मारु भरारी उंच उंच उडताना पाहून दु:ख माझ्या मना भारी नाजुक ...

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण
मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण, कधीही कुठं ही मोकळं करता येतं मन,

उपवासाचा Batata Vada

उपवासाचा Batata Vada
बटाटे मॅश करुन घ्या. त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व जिरं याची पेस्ट घाला. मीठ, लिंबाचं ...