1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (13:46 IST)

ज्योतिष्यात राहू एक रहस्यमय ग्रह, जाणून घ्या राहूचे जीवनात शुभ-अशुभ प्रभाव

राहू सर्व 9 ग्रहांपैकी एक ग्रह आहे. राहूला ज्योतिष शास्त्रात अशुभ ग्रह मानण्यात आला आहे. पत्रिकेत राहूचे अशुभ भावात असल्याने बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागते. तसेच कधी कधी राहू व्यक्तीचे भाग्य देखील बदलून देतो. तर जाणून घेऊ राहूबद्दल काही खास गोष्टी....   
 
राहूचा शुभ प्रभाव
1- जातकाच्या पत्रिकेत राहूच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती फार मान सन्मान मिळवतो. तो त्वरित जवाबदेण्यासाठी ओळखला जातो.    
2- राहूचे शुभ असल्याने जातक परदेश भ्रमण करतो.  
3- पत्रिकेत राहूच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती राजकारणात फार वरच्या जागेवर पोहोचतो.  
4- राहूच्या शुभ प्रभावामुळे व्यक्ती फार मेहनत करून देखील थकत नाही.  
5- राहूच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीला अचानक धनलाभ होतो.  
 
राहूचा अशुभ प्रभाव
1- राहूच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला अपमान सहन करावा लागतो.  
2- राहूच्या अशुभ प्रभावामुळे कुठल्याही कामात व्यक्तीला यश मिळत नाही.  
3- जेव्हा पत्रिकेत राहू अशुभ असतो तेव्हा व्यक्ती नशा करायला लागतो.  
4- राहू राजकारणात तर घेऊन जातो पण बदनामीचा कारण देखील हाच ग्रह असतो.  
5- अशुभ राहूच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या व्यवहार आणि नैतिकतेमध्ये सारखे पतन होण्याची शक्यता असते.