पत्रिकेत मंगळ दोष म्हणजे नेमकं काय ?

mangal dosh
Last Modified मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (08:09 IST)
जन्मपत्रिकेमध्ये लग्न म्हणजे प्रथम किंवा चतुर्थ किंवा सप्तम किंवा अष्टम स्थान यापैकी कोणत्याही स्थानात जर मंगळ असेल तर त्याला सामान्यत: मंगळदोष मानले जाते. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तिला मांगलिक व्यक्ती असे म्हटले जाते. मंगळदोष असणाऱ्या व्यक्तीला गृहस्थाश्रमात अनेक कष्टांचा सामना करावा लागतो. मंगळी किंवा मांगलिक व्यक्तीबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. जसे की त्यांचा विवाह जर दुसऱ्या मागंलिक व्यक्तीशी झाला नाही तर त्याचे परिणाम वाईट होतो. पण खरी परिस्थिती अशी नाही. मंगळ हा अतिशय ऊर्जा देणारा,जीवनात शक्ती, साम्राज्य, शासन, आनंद, काम, पुत्र प्रदान करतो.
प्रथम स्थानातील मंगळ
लग्न म्हणजे प्रथम स्थानामध्ये मंगळ असल्याने व्यक्ती हट्टी किंवा उग्र स्वभावाची असते. या स्थानात उपस्थित मंगळाची चतुर्थ दृष्टी सुख स्थानावर असल्याने या व्यक्तींना गृहस्थसुखांना मुकावे लागते. सातव्या स्थानातील दृष्टी जोडीदाराशी संबंध बिघडण्यासाठी कारणीभूत ठरते. तर आठव्या स्थानावरील दृष्टी जोडीदारासाठी अडचणी निर्माण करते.

द्वितीय स्थानात मंगळ
द्वितीय स्थान धन व कुटंबाचे स्थान असते. हा मंगळ नातेवाईक व आप्तस्वकीयात वादविवाद निर्माण करतो, ज्याचा नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या दांपत्यजीवनावर पडतो. या स्थानातील मंगळ पाचव्या, आठव्या व नवव्या स्थानावर प्रभाव टाकतो. त्याचा संततीवर वाईट परिणाम होऊ शकतो. यांना नशिबाचीही साथ मिळत नाही.
चतुर्थ स्थानातील मंगळ
चतुर्थस्थानातील मंगळ सातव्या, दहाव्या व अकराव्या स्थानावर परिणाम करतो. हा मंगळ स्थायी संपत्ती तर देतो पण जोडीदाराच्या अभावामुळे येणारे गृहस्थाश्रमातील क्लेशही देतो. मंगळाची दृष्टी सातव्या स्थानात असल्याने जीवनात प्रेमाची कमतरता जाणवते व वैचारिक मतभेद होऊ शकतात. या मंगळामुळे घटस्फोट किंवा जोडीदाराला शारीरिक त्रास होत नसला तरी वैवाहिक सुख मात्र निश्चित कमी होते.
सातव्या स्थानातील मंगळ
जोडीदाराच्या म्हणजेच सप्तम स्थानातील मंगळ विवाहासाठी सगळ्यात जास्त हानीकारक असतो. हा मंगळ जोडीदारच्या स्वभावात उग्रता व जोडीदाराच्या आरोग्याला मारक असतो. या मंगळाची प्रथमस्थान, धनस्थान व कर्मभावावर दृष्टी पडते त्यामुळे करिअरमध्ये समस्या, आर्थिक चणचण तसेच एखाद्या दुर्घटनेची शक्यता वाढते. या स्थानात मंगळ असणाऱ्या व्यक्ती विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करतात. याच्या अत्युच्च प्रभावामुळे पतीपत्नीमध्ये दुरावा येण्याचे प्रमाण वाढते.
आठव्या स्थानातील
आठव्या स्थानाचा संबंध कष्ट, भाव, संकट, दु:ख व आयुर्मानाशी येतो. हा मंगळ मानसिक कष्ट देतो, वैवाहिक आनंद नष्ट करतो. शारीरिक व लैंगिक तक्रारी संभवतात. या स्थानातील मंगळ जर वृषभ, कन्या किंवा मकर राशीला असेल तर अशुभ फलाची तीव्रता कमी होते. परंतु मकर राशीतील मंगळ संततीसंबंधी समस्या निर्माण करू शकतो. याशिवाय द्वितीय व बाराव्या स्थानातील मंगळ दांपत्य जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करतो.
बाराव्या स्थानात मंगळ
जन्मपत्रिकेत बाराव्या स्थानाला व्ययस्थानही म्हटले जाते. हे स्थान निद्रेचेही आहे. या भावात मंगळ आल्याने दांपत्य सुखामध्ये बाधा येते. लैंगिक इच्छा प्रबळ होते. शुभ ग्रहांच्या अभावामुळे चारित्र्यावर डाग येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. असे लोक भावुक होऊन आपल्या जोडीदाराला त्रास देऊ शकतात. धनाची कमी वैवाहिक संबंधांवर परिणाम करते. या लोकांना गुप्तरोग व रक्तासंबंधी विकार होण्याची शक्यता असते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार

श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार
पारायण नेहमी मनापासून व भक्तिभावाने करावे. केवळ देखावा करण्यासाठी किंवा दुसरा करतो म्हणून ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत ...

श्री रामदास स्वामींची भीमरुपी हनुमान स्तोत्र संबंधित अद्भुत कथा
श्री स्वामी चाफळच्या नदीवर रोज पहाटे स्नान संध्या करायला जात, संध्या वंदनानंतर ...

Maha Shivratri : कर्जापासून मुक्तीसाठी शिवरात्रीला जपा हे ...

Maha Shivratri : कर्जापासून मुक्तीसाठी शिवरात्रीला जपा हे 17 सोपे शिव मंत्र
महाशिवरात्री आणि नंतर मासिक शिवरात्रीला सूर्यास्‍तावेळी आपल्या घरात बसून आपल्या ...

गजानन महाराज प्रकट दिन विशेष : महाराजांचे प्रथम दर्शन झाले ...

गजानन महाराज प्रकट दिन विशेष : महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे
माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज ...

गणपतीचे त्वरित आर्शीवाद देणारे 8 प्रभावी मंत्र

गणपतीचे त्वरित आर्शीवाद देणारे 8 प्रभावी मंत्र
1. गणपती बीज मंत्र 'गं' आहे. 2. युक्त मंत्र- 'ॐ गं गणपतये नमः' मंत्राचा जप केल्याने ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...