गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (15:18 IST)

मच्छर माश्या घालवण्याचे उपाय

डासांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय देखील करता येतात. या उपायांचा आपल्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी जाणून घेऊया अशाच घरगुती उपायांबद्दल..
 
१. दारं-खिडक्या बंद करुन कापूर जाळावा. कापूराच्या वासाने डास पळून जातात.
२. लसूण पाण्यात टाकून चांगले उकळा. उकळल्यानंतर हे पाणी घरात शिंपडा. लसूणाच्या तिखट वासामुळे डास घरात येणार नाहीत उलट घरातील डास बाहेर जातील.
३. कडुलिंबाचे तेल आणि कापूर यांचे मिश्रण एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरा. हा स्प्रेस तमालपत्रावर मारा आणि नंतर हे तमालपत्र जाळा. याच्या धुरामुळे डास घरातून पळून जातील.
४. कडुलिंबाच्या तेलात कापूर मिसळा अन् त्याचा दिवा लावा. यामुळे डास तुमच्या जवळही फिरकणार नाहीत.
५. पुदिन्याच्या उग्र गंधामुळेही डास दूर पळतात. रात्री झोपण्याआधी हाता-पायांना १-२ पुदिन्याची पानं चोळावी. ज्यामुळे रात्रभर तुमच्याजवळ डास फिरकत नाही.
६. तुळशीच्या पानांचा रस लावल्यास डास चावत नाहीत. बऱ्याच वेळा डास चावलेल्या ठिकाणी तुळशीच्या पानांचा रस लावला जातो. जेणे करुन खाज सुटणार नाही.