शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: रविवार, 23 मे 2021 (17:01 IST)

व्हाईट फंगस काय आहे ? जाणून घ्या

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत आहे, परंतु कोविड रुग्णांमध्ये कोरोनामधून बरे झाल्यानंतर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. होय, कोविडनंतरचे नवीन-नवीन आजार  समोर येत आहेत. तसेच, कोरोना विषाणूचा धोका मधुमेह आणि हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांसाठी जीवघेणा आजारापेक्षा कमी नाही. आजकाल ब्लॅक फंगसचा आजार कोविडनंतरच्या रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात समोर येत आहेत. या रोगाचा उपचार अजून  लोकांपर्यंत पोहोचला नव्हता आणि आता व्हाइट फंगस कोरोना आणि इतर रुग्णांमध्ये आणखी एक आजार सापडला आहे.
 
चला जाणून घेऊ या की हा व्हाईट फंगस ब्लॅक फंगस पेक्षा कसा काय वेगळा आहे ?
 
व्हाईट फंगस म्हणजे काय ?
व्हाईट फंगस याला कँडिडा असे ही म्हणतात. हे रक्ताद्वारे शरीरात पोहोचतो आणि इतर अवयवांना प्रभावित करतो.व्हाईट फंगस मुळे नखे,पोट,किडनी,गुप्तांग,तोंडासह फुफ्फुसांना संक्रमण होण्याचा धोका असतो. हा रोग कोविड नसलेल्या रुग्णांमध्येही आढळत आहे.
 
व्हाईट फंगस ची लक्षणे- 
याची काही लक्षणे कोविड सारखीच आहेत. जसे की - श्वास लागणे, छातीत दुखणे, कोल्ड सर्दी, खोकला. या व्यतिरिक्त इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत-
 
* सांधे दुखी होणे. 
- मेंदूत परिणाम होणे. ज्यामुळे विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
- उलट्या होणे, किंचित बोलण्यात अडथळा येणे.
 
ही चूक करू नका -
व्हाईट फंगस देखील कोरोनासारख्या फुफ्फुसांवर आक्रमण करतो. जर आपल्याला छातीत दुखणे, श्वास घेण्यास  त्रास होत असेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोरोनाचे  उपचार सुरू करू नका.
 
या लोकांना व्हाईट फंगस मुळे धोका आहे- 
 
* रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असणे.
*  मधुमेहचे  रुग्ण
*  कोरोना चे रुग्ण 
*  कोरोनाचे रूग्ण बर्‍याच काळासाठी रुग्णालयात दाखल असलेले .
*  ज्या रूग्णांना ऑक्सिजन दिली जात आहे.
*  कर्करोगाचे रुग्ण, एचआयव्ही असलेले, कुपोषित मुले.
 
 व्हाईट फंगस कसे टाळावे -
 
* ऑक्सिजन देणाऱ्या डिव्हाइसच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या.
*  नाकात आणि तोंडात लावणारे उपकरण बुरशी मुक्त असावे. 
*  मधुमेहांच्या रुग्णांची  शुगर लेव्हल तपासणी करत राहावे .
* आपण आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. ओलावा आणि ओले ठिकाण नसावे.
 
व्हाईट फंगस चे उपचार- 
 
* डॉक्टरांकडून लेखी चाचणी करवून घ्या. 
*  ताजे फळ खा
* डबाबंद वस्तू खाऊ नका.
*  घरात जास्त ओलावा होऊ देऊ नका.
*  घरात प्रकाश येऊ द्या
 
ब्लॅक फंगस पेक्षा अधिक धोकादायक आहे व्हाईट फंगस -
कोरोना रूग्ण आणि पोस्ट कोविड रूग्णांमध्ये ब्लॅक फंगस चे प्रमाण जास्त आढळते. कोरोना दरम्यान रुग्णांना स्टिरॉइड्स देण्याचा धोकाही जास्त समोर येत आहे. नाकातुन काळे पाणी येणं , नाक बंद होणे, नाकाभोवती सूज येणे, डोळे लाल होणे, तोंडात दुखणे ही लक्षणे आहेत.
 
ब्लॅक फंगस दरम्यान समान गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आजूबाजूला ओलावा नसावा, ऑक्सिजन देणाऱ्या सर्व उपकरणांमध्ये ओलावा नसावा. केवळ स्टेरलाइट पाणी वापरा.
डॉक्टरांच्या मते, ब्लॅक फंगस पेक्षा व्हाईट फंगस कमी हानिकारक आहे. त्याचे उपचार वेळीच करणे  शक्य आहे.