1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2024 (17:36 IST)

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

अमेरिकेत मुलींना पहिली मासिक पाळी लवकर येत आहे असं एका संशोधनातून समोर आलं आहे. त्यासाठी विषारी हवा काही प्रमाणात जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे.अनेक दशकांपासून विविध देशातील वैज्ञानिक या मुद्द्यावर काळजी व्यक्त करत आहेत की मुली मागच्या पिढीच्या तुलनेत फार लवकर वयात येत आहेत.मुलींना पहिल्यांदा पाळी येते त्या वयाला ऋतू येण्याचा काळ असं म्हणतात. पाळी लवकर आल्यामुळे शरीरात जे इतर बदल होतात तेही लवकर व्हायला सुरुवात होते.

एका अंदाजानुसार, अमेरिकन मुलींमध्ये मागच्या काळातील मुलींच्या तुलनेत चार वर्षं आधी मासिक पाळी सुरू होते.मुली लवकर वयात का येत आहेत, जाणून घ्या.
मे महिन्यात समोर आलेल्या नवीन आकडेवारीनुसार 1950 ते 1969 या काळात जन्माला आलेल्या मुलींना 12.5 या वयात पाळी सुरू व्हायची.मात्र, 2000 च्या दशकात सुरुवातीला जन्माला आलेल्या पिढीत हे वय कमी होऊन सरासरी 11.9 झालं आहे.
 
लवकर पाळी येण्याचे परिणाम
जगभरातही असाच ट्रेंड बघायला मिळत आहे. दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी याबाबत काळजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते यामुळे मुलींमध्ये तारुण्याची लक्षणंही कमी वयात दिसू लागतात.
 
या वैज्ञानिकांच्या मते लवकर पौगंडावस्थेत येणं किंवा आठ वर्षाच्या आधी पाळी येण्याचं प्रमाण 2008 ते 2020 या काळात 16 पटींनी वाढलं आहे.
 
अमेरिकेतील अटलांटा विद्यापीठातील एमरी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक ऑड्रे गॅस्किंस म्हणतात की, “ कमी वयात पाळी येणं हे निम्न सामाजिक आर्थिक समुदायात आणि अल्पसंख्याक समुदायात अधिक प्रमाणात दिसून येतं, याचा आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो.”
 
गॅस्किंस सारख्या संशोधकांना मुख्य काळजी ही आहे की पाळी लवकर आल्याने इतर गोष्टींही बदलता आणि वयस्क झाल्यावर त्याचे दूरगामी परिणाम होतात.
आकडेवारीनुसार पाळी लवकर आल्यामुळे प्रजननक्षमता कमी होते आणि मेनापॉजही लवकर येतो, त्याचा वयावरही परिणाम होतो.
 
पाळी लवकर आल्यामुळे स्तनांचा आणि ओव्हरीजचा कॅन्सर, टाइप 2 डायबेटिस, आणि हृदयाशी संबंधित इतर आजार होऊ शकतात.लवकर मेनोपॉज येण्याची कारणं काय? वाचा सविस्तर
 
अनेक कारणं असू शकतात
असं का होतं हे समजून घेण्याचाही संशोधक प्रयत्न करत आहेत.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील आरोग्य विषयाच्या प्राध्यापक ब्रँडा स्कॅनजी याचं एक कारण सांगतात.
त्यांच्या मते, जर शरीरातील पेशी इस्ट्रोजेन सारख्या सेक्स हॉर्मोनच्या संपर्कात जास्त काळ राहिल्या तर त्यामुळे ट्युमर होण्याची शक्यता असते. कारण त्यामुळे पेशींमध्ये वाढ होते.
 
त्या म्हणतात, “या शिवाय काही संशोधनानुसार, हार्मोन्सच्या अतिरिक्त संपर्कात राहिल्यामुळे रिप्रॉडक्टिव्ह कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.”
 
याशिवाय सामाजिक पातळीवरही अनेक धोके आहेत. स्कॅनजी सांगतात की, मुली लवकर यौवनावस्थेत जातात त्यामुळे वेळेआधी लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याचं प्रमाणही वाढतं,
 
त्या पुढे सांगतात, “अमेरिकेत अवैध पद्धतीने गर्भपात होत आहे आणि गर्भनिरोधक उपलब्ध नाहीत. ही स्थिती भयावह आहे. यामुळे तरुण मुलींमध्ये नको असलेल्या गर्भधारणेचं प्रमाण वाढेल, ही चिंताजनक स्थिती आहे.”
यौवनावस्थेत शरीरात दोन संवादाची माध्यमं तयार होतात. त्याला हायपोथॅलेमिक पिट्युटरी अॅड्रिनल (HPA) आणि हायपोथॅलॅमिक पिट्युटरी गोनडल (HPG) अक्सेस म्हणतात.
 
मेंदूच्या एका भागात हायपोथॅलेमस म्हणतात, त्याला जोडतात. हायपोथॅलॅमस भागात शरीराचं तापमान नियंत्रित होतं तसंच शरीराची विविध कार्यं हार्मोन स्रवणाऱ्या ग्रंथींच्या सहाय्याने नियंत्रित केले जातात.
 
गॅस्किंस यांचं म्हणणं होतं की 10 ते 20 वर्षांआधीपर्यंत वैज्ञानिकांचं मत होतं की लवकर पाळी येण्याचं एकमेव कारण बालपणी असलेला लठ्ठपणा आहे..मात्र नुकतंच लोकांना कळलं आहे की फक्त हेच एक कारण असू शकत नाही. यामागे इतरही अनेक कारणं आहेत.
 
वायू प्रदूषणही असू शकतं महत्त्वाचं कारण
गेल्या तीन वर्षांत इतर काही संशोधनात एक महत्त्वाच्या कारणाकडे लक्ष वेधलं जातं ते म्हणजे वायू प्रदूषण.
 
या संशोधनाचा बराचसा भाग दक्षिण कोरियाच्या संशोधकांनी पार पाडला आहे. सोल बुसान, इंचियोन, या शहरांचा IQAirच्या निर्देशांकानुसार जगाच्या 100 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये समावेश होतो.
 
सोल येथे असलेल्या इवा महिला विद्यापीठाने नुकतंच एक विश्लेषण केलं. त्यात प्रदूषणासाठी जबाबदार घटक आणि पाळी लवकर येण्याच्या संबंधी लिहिलं गेलं आहे.
 
सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड आणि ओझोन ही याची प्रमुख कारणं आहेत. गाडीतून निघणारा धूर, कारखान्यातून निघणारा कचरा यांच्यामार्फत वातावरणात येतो.
2002 मध्ये पोलंडमध्ये एक संशोधन झालं. कोळसा अधिक प्रमाणात जाळल्यामुळे तिथल्या हवेची गुणवत्ता खराब होते.
या अभ्यासात 1257 महिलांना घेऊन सर्वेक्षण करण्यात आलं. नायट्रोजन गॅसशी अधिक संपर्क आणि 11 वर्षांच्या आधी येणारी पाळी यांच्यात काहीतरी संबंध आहे.
पीएम पार्टिकल ही यापेक्षाही मोठी समस्या आहे. ते कण इतके छोटे असतात की दिसतही नाहीत.
हे कण कारखान्यांपासून जंगलातली आग, वीजेची सयंत्रं, वाहनांचे इंजिन, तसंच कच्चा आणि धुळीचा रस्ता यामुळेही हवेत मिसळले जातात.

गॅस्किंस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2023 मध्ये केलेल्या संशोधनानुसार ज्या अमेरिकन मुली गर्भात असताना किंवा बाल्यावस्थेत पीएम 2.5 किंवा पीएम 10 पार्टिकल्सच्या सान्निध्यात येतात, त्यांची पहिली पाळी कमी वयात येण्याची शक्यता वाढीला लागते.
पीएम 2.5 किंवा पीएम 10 हे हवेतल्या कणांचे आकार आहेत.
पीएम 2.5 हे कण कुठेही पोहोचू शकतात
गॅस्किंस म्हणतात, “पीएम 2.5 हे कण रक्तात आरामात जाऊ शकतात. तुम्ही श्वासावाटे ते आत घेता आणि ते मोठ्या कणांसारखे फिल्टर होत नाहीत आणि दुसऱ्या भागापर्यंतही पोहोचतात.
 
आम्ही काही कणांना प्लासेंटा, गर्भाच्या उतींमध्ये आणि अंडाशयातही जमा होताना पाहिलं आहे. ते प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकतात.”
 
घराच्या आसपास घेतलेल्या नमुनांच्या आधारे लक्षात आलं आहे की या कणात असलेली रसायनं, शरीराच्या वाढीसाठी गरजेच्या हार्मोन्सवर त्यांचा परिणाम होतो. त्यामुळे लवकर वयात येण्याचे प्रकार होतात.
 
गॅस्किंस म्हणतात, “हे आमचं सुरुवातीचं आकलन आहे की, ज्या मुलीचा पीएम 2.5 कणांशी अधिक प्रमाणात संपर्क आला आहे, त्यांच्यावर इतर रसायनांचाही परिणाम झाला. त्यामुळे शरीरात असे बदल झाले की लवकर यौवनावस्था आली.”
गॅस्किंस यांच्यामते मुलींच्या शरीरात लवकर बदल होण्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. त्यांच्या मते पीएम2.5 आणि अन्य गोष्टी याचं एक उदाहरण आहे.
 
त्याचवेळी ब्रँडा स्कॅनजी यांच्या मते आपलं बदलतं जग आणि त्याच्या मुलांच्या विकासावर होणारा परिणाम याच्याबद्दल आम्हाला आत्ता जास्त माहिती नाही. मायक्रो प्लॅस्टिक आमि हवामान बदल या गोष्टी किती जबाबदार आहेत याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत.
 
त्या म्हणतात, “मला वाटतं की आत्ता आमच्याकडे फारच कमी माहिती आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा पाळीवर किती परिणाम होतो हे आम्हाला माहिती नाही. पर्यावरणातील रासायनिक मिश्रणं, लठ्ठपणा आणि मानसिक कारणं यांच्यामुळे तारुण्यात लवकर प्रवेश होत आहे.”
 
Published By- Priya Dixit