आयुष मंत्रालय Guideline : इम्यून सिस्टम मजबूत कसे करावे, जाणून घ्या

immunity
Last Modified गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (15:10 IST)
संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या साथीने लढत आहे. या साथीच्या आजाराला टाळण्यासाठी आपल्याला आरोग्याची काळजी घेणं आणि स्वतःला निरोगी ठेवणं आवश्यक आहे. जेणे करून कोणताही रोग आपल्यावर प्रभुत्व मिळवू शकणार नाही. या साठी आपली प्रतिकारक क्षमता चांगली असावी लागते. या सर्व बाबीला लक्षात घेता आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या संकटाच्या वेळी स्वतःची काळजी आणि रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी काही सूचना जाहीर केल्या आहेत. ज्यांना पाळून आपण आपली प्रतिकारक शक्ती सुदृढ करू शकतो.

* दिवसभर फक्त गरमपाणी प्यावं.

* व्यायाम- आयुष मंत्रालयाने सल्ला दिला आहे की दररोज किमान 30 मिनिटे योग केले पाहिजे. या मध्ये प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश करावा.

* आहार - आपल्या आहारात हळद, जिरे, धणे आणि लसूण इत्यादींचा समावेश नक्की करा. हे सर्व पदार्थ आपल्या प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यात मदत करतात.

* च्यवनप्राश घ्या- दररोज 1 चमचा च्यवनप्राशचे सेवन करावे. जे मधुमेहाचे रोगी आहेत, ते शुगरफ्री असलेले च्यवनप्राश घेऊ शकतात.
* हर्बल चहा - हर्बल चहा आपल्या दररोजच्या दिनचर्येचा एक भाग बनवा. तुळस, दालचिनी, काळीमिरी, सुंठ, मनुका घालून काढा बनवून दिवसातून 2 वेळा घ्यावा. यामध्ये आपण गूळ आणि ताजे लिंबू देखील मिसळू शकता.
* हळदीचं दूध - हळदीच्या दुधाचे सेवन नक्की करावे. गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळा, हे आपण दिवसातून 1 ते 2 वेळा घेऊ शकता.

* सकाळ संध्याकाळ तीळ किंवा नारळाचं तेल किंवा साजूक तुपाचा वापर करू शकता. याला आपल्या नाकाच्या छिद्रात लावा.

* 1 चमचा तिळाचे किंवा नारळाचं तेल तोंडात घेऊन 2 ते 3 मिनिटे तोंडात ठेवून गुळणे करा. नंतर गरम पाण्याने गुळणे करा. असे दिवसातून 2 वेळा करावे.
* दिवसातून किमान 1 वेळा पुदीन्याची पाने आणि ओवा टाकलेल्या पाण्याची वाफ घ्यावी.

* जर आपल्याला खोकला किंवा घशात खवखव होत असल्यास लवंगाची पूड गूळ किंवा मधात मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा चाटण घ्या.

हे उपाय कोरडा खोकला आणि घशाच्या खवखवीसाठी फायदेशीर आहे, तरी पण हे लक्षण कायम राहिल्यास तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. वरील दिलेल्या सर्व उपायांना आपल्या सोयीनुसार वापरा. हे उपाय देशातील नामांकित वैद्याने सांगितलेले आहेत, जे संक्रमणविरुद्ध रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास सक्षम आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

पंचतंत्र कथा : ब्राह्मणाचे स्वप्न

पंचतंत्र कथा : ब्राह्मणाचे स्वप्न
एक कंजूस ब्राह्मण एका शहरात राहत होता. त्याने भिक्षावळीमध्ये मिळालेल्या सातूच्या पिठाने ...

मायक्रोव्हेव्हची स्वच्छता कशी करावी काही सोप्या टिप्स जाणून ...

मायक्रोव्हेव्हची स्वच्छता कशी करावी काही सोप्या टिप्स जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर आपण स्वच्छतेची काळजी घेतली तर ...

आरोग्य टिप्स : अंघोळ करताना कानात पाणी गेलं आहे या टिप्स ...

आरोग्य टिप्स : अंघोळ करताना कानात पाणी गेलं आहे या टिप्स अवलंबवा
नेहमी असं होत की अंघोळ करताना कानात पाणी शिरतं, जे काढण्यासाठी नको ते प्रयत्न केले जाते. ...

मलासन योग : बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास असल्यास हे आसन करा

मलासन योग : बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास असल्यास हे आसन करा
योग आसन मलासन हे करायला खूप सोपं आहे. दररोज प्रत्येक व्यक्ती हे आसन करतोच.परंतु ह्याला ...

काय सांगता लोणीचा वापर असा देखील करता येतो

काय सांगता लोणीचा वापर असा देखील करता येतो
लोणी ज्याचा वापर आपण आहारात आणि अन्नात करतोच. लहान मुलांना लोणी खूप आवडतं. मुलं तर लोणी ...