व्यायामाची सुरुवात करताना

Last Modified बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (17:41 IST)
हिवाळ्याचा काळ हा पोषक असतो, त्या काळात भूकही जास्त लागते. पण हाच काळ तंदुरूस्ती राखण्यासाठीही उत्तम असतो. त्यामुळे अनेक जण हिवाळ्यात व्यायामाची सुरुवात करतात. कोणत्याही प्रकारचा व्यायाम आपल्याला तंदुरूस्त राहाण्यासाठी, शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच स्थूलता वाढू न देण्यासाठी उपयुक्त असतो. अनेकदा काही जुनाट शारीरिक तक्रारीही व्यायाम सुरू केल्यानंतर कमी होतात. एक नियमित व्यायाम सुरू ठेवल्यास त्याचे अनेक फायदे होतात. जसे मानसिक आरोग्य चांगले राहाते, नियमित झोप येण्यास मदत होते.
कोणाही व्यक्तीला तंदुरूस्त, आरोग्यपूर्ण राहायचे असेल तर नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. त्याला दुसरा काही पर्याय असू शकत नाही. कोणत्याही प्रकारचा व्यायाम जर नियमितपणे करायला सुरूवात केली तरच त्याचे फायदे दिसू लागतात. पण काही लोक आरंभशूर असतात, ते उत्साहाने
सुरुवात करतात पण नियमितपणा ठेवत नाहीत. तर काहींना सुरुवात करणेच खूप कठीण जाते. अर्थात व्यायाम करून तंदुरूस्त राहायचेच, असा दृढ संकल्प केला असेल तर ही गोष्ट कठीण नाही. काहींना मात्र नियमित व्यायाम करणे शक्य होत नाही कारण त्यांच्या मार्गात काही ना काही अडथळे येतच राहातात. काही वेळा आळशीपणामुळेही व्यायाम टाळत असाल तर व्यायाम सुरू करण्यासाठी काही उपाय सांगतो, त्यामुळे व्यायाम सुरू करण्यासाठी मदत होईल.
व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा : व्यायाम करायला खूप उत्साहाच्या भरात सुरुवात करतो मात्र नंतर व्यायाम करणे सोडून देतो. त्यासाठी अशा व्यायाम प्रकाराची निवड करा, जो आपण सातत्याने करू शकतो. त्याव्यतिरिक्त व्यायामाने जे लक्ष्य साध्य करायचे आहे ते देखील वास्तववादी असणेही महत्त्वाचे आहे. त्याशिवाय व्यायाम करण्यापूर्वी आपल्याला काही आरोग्य समस्या, शारीरिक समस्या भेडसावत असतील तर व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायामाला सुरुवात केल्यास प्राथमिक मार्गदर्शन मिळाल्याने व्यायाम योग्य पद्धतीने सुरू करता येईल. व्यायाम करताना सुरूवातीला उत्साह असतो. उत्साहाच्या भरात खूप व्यायाम करण्यापेक्षा हळूहळू सुरुवात करावी. सरावानुसार हळूहळू व्यायामाची तीव्रतावाढवावी. हल्ली प्रत्येक व्यक्ती घड्याळापाठी धावत असते. त्यामुळे सगळ्यांचेच आयुष्य व्यग्र झाले आहे. परंतु व्यायामाला सुरुवात कराल तेव्हा एकच वेळ निश्चित करा. ती वेळ शक्यतो बदलू नका. एक तासाचा वेळ काढू शकत नसाल तर किमान अर्धा तास किंवा 15 मिनिटांचा वेळ जरूर काढावा. मात्र व्यायामात नियमितता असली पाहिजे.
व्यायाम सुरू करणार्‍या नव्या व्यक्ती एक चूक करतात की पहिल्या दिवसापासूनच खूप जास्त प्रमाणात व्यायाम करायला सुरूवात करतात. मात्र असे करणे हितावह नाही कारण अचानक तीव्र हालचाली केल्याने इजा होण्याची शक्यताच अधिक असते. एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी ती म्हणजे अति तेथे माती. व्यायामातही अति उत्साह, अति तीव्रता, अतिप्रमाण हे योग्य नाही. आठवड्यातून एक दिवस व्यायामाला सुट्टी देखील देऊ शकतो. त्यामुळे तंदुरूस्ती राखण्यासाठी जी दिनचर्या आपण सुरू करतो आहोत, ती उत्साहाने कायम ठेवू शकतो.
नव्या दमाच्या लोकांसाठी काही तंदुरूस्ती राखण्यासाठी टिप्स
दिवसभरात खूप पाणी प्यावे. व्यायामाने शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते. पाणी प्यायल्यास डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी मदत मिळते.

सुपाच्य, योग्य आहार सेवनकरा. त्यामुळे व्यायामाला आहाराची जोड मिळून तंदुरूस्तीचे लक्ष्य साध्य करता येईल. भाज्या, फळे आदींचा समावेश असलेला संतुलित आहार सेवन करावा. आहारात चांगले पौष्टिक कार्ब्सअसावेत. त्यामुळे स्नायूंची ताकद भरून निघण्यास मदत होते. तसेच शरीराची ऊर्जा पातळीही वाढते.
प्रथिनांचे सेवन जरूर करावे. स्नायूंची ताकद वाढतेच पण उती निरोगी राखण्यासही मदत होते. स्नायूंच्या निर्मितीची सुविधाही मिळते. मेद किंवा चरबी आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे खरे असले तरी सर्वच प्रकारची चरबी घातक नसते. चांगले मेद वास्तविक वेगाने चरबीचे ज्वलन करण्यास मदत करतात. ऊर्जेची पातळी वाढवण्यासही मदत करतात. त्यामुळे आपण खूप जास्त वेळ उत्साहाने कार्यरतही राहू शकतो. रोजच व्यायामाला सुरूवात करण्यापूर्वी वॉर्मअप करणे महत्त्वाचे आहे. सकाळी उठून एकदम व्यायामाला सुरुवात करणे योग्य नाही. त्यासाठी वॉर्मअप करणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला इजा होण्यापासून बचाव होतो. वॉर्मअपमुळे शरीराला लवचिकताही प्राप्त होते.
थोडक्यात व्यायाम सुरू करताय ही न्रकीच चांगली गोष्ट आहे, मात्र व्यायाम हा थोडे दिवसांची हौस न ठरता नियमितपणे सुरू ठेवणे हेअधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी दृढ संकल्प करणे गरजेचे आहेच, परंतु व्यायाम सुरू करण्यापूर्वी योग्य तो सल्ला घेऊन हळूहळू सुरुवात करणे अधिक फायाचे आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

थंडगार कैरीचं पन्हं, सोपी विधी जाणून घ्या

थंडगार कैरीचं पन्हं, सोपी विधी जाणून घ्या
साहित्य - 4 - 5 नग कैऱ्या, 4 वाटी साखर, वेलची पूड, मीठ. कृती - कैऱ्या साली ...

आरोग्य टिप्स : कोरड्या खोकल्यावर घरघुती उपाय करुन बघा

आरोग्य टिप्स : कोरड्या खोकल्यावर घरघुती उपाय करुन बघा
बदलत्या हंगामाच्या आपल्या शरीरांवर प्रभाव पडत असतो. सर्दी पडसे तर हमखास होतोच. विशेषतः ...

21 Days lock down: पार्टनरसोबत अशा प्रकारे घालावा वेळ

21 Days lock down: पार्टनरसोबत अशा प्रकारे घालावा वेळ
हा काळ असा आहे की आपल्याला आपल्या कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळत असेल. ...

आरोग्यासाठी फायदेशीर मखाणे, हे खाल्ल्यास 6 रोग राहतील

आरोग्यासाठी फायदेशीर मखाणे, हे खाल्ल्यास 6 रोग राहतील लांब..
माखाणे सारख्या सुक्या मेव्याचे गुणधर्म आणि त्याचे फायदे ऐकल्यावर आपण दररोजच्या आहारात ...

सिगरेट ओढताय कोरोनाचा तुम्हाला जास्त धोका

सिगरेट ओढताय कोरोनाचा तुम्हाला जास्त धोका
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोना संबंधीत एक अति महत्त्वाची ...