गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 8 मे 2021 (18:52 IST)

मास्क वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे आणि हातांना वेळोवेळी धुण्याचा सल्ला दिला जात आहे. आपण मास्क लावत असाल तर या काही गोष्टींना लक्षात ठेवा जेणे करून आपल्याला काही त्रास होता काम ना ये.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
काही लोक मास्क चा वापर दीर्घकाळ करतात या मुळे त्यांच्या रक्तात ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते. मेंदू ला ऑक्सिजनचा पुरवठा कमी मिळू शकतो,अशक्तपणा जाणवतो.म्हणून मास्क लावताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. 
 
* आपण एकट्यात असल्यास याला काढून ठेवा आणि संपूर्ण वेळ घालून बसू नका. 
 
* कार मध्ये देखील मास्क वापरू नका.आपण एकटे असल्यास मास्क घालण्याची गरज नाही. 
 
* एसी मध्ये मास्क लावू नका. 
 
* वर्दळीच्या ठिकाणी मास्क वापरा. 
 
* आपल्या सह नेहमी दोन मास्क ठेवा .प्रत्येक 4 -5 तासानंतर मास्क बदला आणि अधिक काळ मास्क वापरू नका.