शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 26 मार्च 2022 (11:58 IST)

शरीरासाठी फायदेशीर मनुकाचे पाणी, सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रत्येक सुक्या मेवाचे स्वतःचे फायदे आहेत. काही शक्तिवर्धक असतात तर काही प्रतिकारशक्ती वाढवतात. सुक्या मेवांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते प्रत्येक आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. तसेच, सर्व वयोगटातील लोक कोणत्याही समस्यां शिवाय त्यांचे सेवन करू शकतात. 
 
सर्व ड्रायफ्रुट्समध्ये मनुके किंवा बेदाणे ला विशेष स्थान आहे. तुम्ही मनुके स्वादिष्ट शिरा, लाडू , किंवा खीरमध्ये घालून खाल्ले असतील. त्यांचे आकार लहान असूनही, मनुका उर्जेने भरलेले आहेत. त्यात फायबर, व्हिटॅमिन आणि खनिजे देखील असतात. साखरेचा हा एक नैसर्गिक स्रोत आहे ज्यामध्ये कोणतेही पदार्थ नसतात. 
जर आपण आरोग्याबद्दल बोललो तर ते खूप फायदेशीर आहे. 1 कप मनुकामध्ये 3.3 ग्रॅम फायबर असते. मनुका हा आयुर्वेदातील अत्यंत फायदेशीर आहार मानला आहे. मनुकामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे काही विशिष्ट बाबींवर उत्तम काम करतात. यामध्ये फुफ्फुस, मेंदू, घसा, आतडे आणि पचन या समस्यांचा समावेश होतो. मनुका पाण्यात भिजवून पाणी घेतल्याने आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
 
मनुकाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या -
मनुका पाण्यात रात्रभर भिजवून, नंतर गाळून पाणी गरम करून तयार केले जाते. हे पाणी पचन सुधारण्यासाठी, विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी आणि विविध महत्त्वपूर्ण पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवण्यासाठी ओळखले जाते.

मनुक्याचे पाणी शरीरात लोह आणि अँटिऑक्सिडंट्सची पातळी वाढवतात. कारण हे पाणी मनुका म्हणजेच वाळलेल्या द्राक्षांपासून बनवले जातात. आयुर्वेदात मनुकाचे पाणी वात दोष शांत करण्याचे काम करतात.   
 
 वात दोष ऍसिडिटी आणि पोटाच्या इतर समस्यांमुळे उद्भवतो.वात दोष मनुकाच्या  पाण्याने बरा होऊ शकतो. पित्त आणि त्याचे त्रास  दूर करण्यासाठी मनुका चे पाणी पिणे फायदेशीर आहे.  
 
 मनुका पाण्याचे फायदे -
1 पचनक्रिया निरोगी ठेवते -जर एखाद्या व्यक्तीला पोटाशी संबंधित समस्या जसे गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या तक्रारी असतील तर सकाळी रिकाम्या पोटी मनुकाच्या पाण्याचे सेवन करून आपल्या पचनाच्या समस्येवर मात करू शकतो. तसेच ,मनुकाच्या पाण्याने पचनक्रिया निरोगी पद्धतीने काम करते. हे चयापचय(मेटॅबॉलिझम) पातळी वाढवते, यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 
 
2 रोग प्रतिकारशक्ती बळकट करते - कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे अनेक आजार उद्भवतात .अशावेळी मनुकाचे पाणी  खूप उपयोगी आहे. वास्तविक, मनुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी दोन्ही आढळतात. याशिवाय मनुकामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.
 
3 त्वचा चमकदार बनवते - मनुकाचे पाणी सेवन करणे त्वचेसाठी फायदेशीर आहे कारण ते तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढते. यामुळे  रक्त शुद्ध होऊन त्वचा चमकदार आणि सुंदर राहते.