मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (17:39 IST)

आरोग्य विशेष : या लहान लहान चुका देखील स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करतात

सामान्यतः असे मानले जाते की निरोगी राहण्यासाठी निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. परंतु निरोगी राहण्याचे सूत्र निव्वळ या पुरतीच मर्यादित नाही. खाण्या-पिण्याचा व्यतिरिक्त अश्या बऱ्याच गोष्टी आहे ज्या स्त्रीच्या आरोग्यास परिणाम करतात. चला तर मग आज आम्ही आपणास अश्याच काही चुकांबद्दल सांगत आहोत, जे स्त्रियांचा आरोग्यावर परिणाम करतात.

* काही स्त्रिया एकच ब्रा जास्त काळापर्यंत वापरतात. परंतु प्रत्यक्षात स्त्रियांनी ब्रा तीन वेळा वापरल्यानंतर धुऊन टाकावी. जास्त काळ वापरल्याने त्यामधून घाण वास येऊ लागतोच त्याच बरोबर कप फॅब्रिक पसरतो, ज्यामुळे स्तनांचा आकार खराब होऊ शकतो.
* दमट दिवसांमध्ये स्त्रियांना काळे कपड्यांपासून लांबच राहावं. विशेषतः अंतर्वस्त्र काळ्या रंगाचे घातल्याने त्वचेत जळजळ, ब्रेस्ट फंगस, रक्ताभिसरणात कमतरता आणि हायपर- पिग्मेंटेशन सारखे त्रास होऊ शकतात.
* बऱ्याच वेळा स्त्रिया तहान भागविण्यासाठी उभे राहून पाणी पितात. ज्यामुळे त्यांना गुडघे दुखीचा त्रास होऊ लागतो म्हणून नेहमीच खाली बसूनच पाणी प्यावं.
* मासिक पाळीच्या वेळेस पॅड बदलण्याची खास काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपल्याला दर 5 तासानंतर
सॅनेटरी नॅपकिन बदलले पाहिजे. असे केल्यास आपल्याला कोणतेही प्रकारचे संसर्ग आणि बॅक्टेरिया होण्याची शक्यता कमी होते. पॅडला दिवसातून 2 ते 3 वेळा बदलावं आणि नेहमीच स्वच्छ पॅड वापरावे.