पायाचे तळवे...

Last Modified बुधवार, 11 मार्च 2020 (11:35 IST)
अनेकांना पायाच्या तळव्याची आग होत असल्याचा अनुभव होतो. या समस्येवर काही घरगुती उपाय करता येतात.

चंदनाच्या पावडरमध्ये गुलाबपाणी टाकावे आणि हा लेप तळपायाला लावावा. असे केल्याने तळपायाची आग होणे थांबते.

रात्री झोपण्यापूर्वी मलईमध्ये लिंबाचा रस टाकावा आणि त्याने आपल्या तळव्यांना मालीश करावे. सकाळी तो पाय धुवून टाकावा. पायाच्या तळव्यावर ऑलिव्ह तेलाने मसाज केल्यानेही तळव्याची त्वचा चांगली राहण्यास मदत होते. त्याचबरोबर कारल्याचा रस पायाला लावल्यानेही आराम मिळतो. कारल्याच्या रसामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.
तळव्याला तूप लावण्यानेही आराम मिळतो.

तिळाच्या तेलाने पायाला आणि तळव्यांना मालीश करावी. मालीश केल्यानंतर कोमट पाण्याने पायाला शेक द्यावा.

देशी तुपात मीठ घालून त्या मिश्रणाद्वारे तळव्याला मसाज केल्यानेही आराम मिळतो. तसेच पायाला भेगा पडत नाहीत.

तळपायाची आग होत असेल तर बॉटल मसाज थेरपीद्वारे उपचार केले जातात. त्याकरिता प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये 30 टक्के एवढे पाणी भरा. ही बाटली फ्रिजरमध्ये ठेवून द्या. बाटलीमध्ये बर्फ तयार झाल्यानंतर ती बाहेर काढा. बाटलीबाहेर जमा झालेले पाणी पुसून काढा. ही बाटली कोरड्या टॉवेलवर अथवा कोरड्या कपड्यावर ठेवा. खुर्चीवर बसून पायाच्या तळव्याच्या मधल्या भागावर ही बाटली ठेवा. आणि ही बाटली आपल्या तळव्यानेच पुढेमागे करा. असे केल्याने तळव्यात रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होतो आणि तळव्यातील पेशींना हलका मसाज होतो. दहा ते पंधरा मिनिटे हा प्रयोग करा. त्यासाठी आपल्याला कोणाचीही मदत लागत नाही. आपण एकट्यानेच हा प्रयोग करू शकतो.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय

शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय
केवळ जीवनशैलीत काही लहानसे परिवर्तन करून आपण शरीर आकर्षक बनवू शकतात.

परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम ...

परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम प्रेमी
काही ड्रग्सच्या तुलनेत डार्क चॉकलेट आपल्याला अनेक गंभीर आजरांपासून वाचवण्यात मदत करते. ...

दुधाबरोबर मध घेतल्याचे फायदे जाणून घेऊ या

दुधाबरोबर मध घेतल्याचे फायदे जाणून घेऊ या
आपल्याला हे माहितीच आहे की नियमित दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु जर आपण दुधात ...

शेवगाच्या शेंगा एक अमृत... सर्व आजारांवर उपयोगी

शेवगाच्या शेंगा एक अमृत... सर्व आजारांवर उपयोगी
शेवगाच्या शेंगांचे आपल्या आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. शेवगाच्या शेगत 300 हून अधिक ...

हायपरएसिडिटी म्हणजे नक्की काय... जाणून घ्या काय खावे आणि ...

हायपरएसिडिटी म्हणजे नक्की काय... जाणून घ्या काय खावे आणि काय नाही
अतिआम्लतेला हायपरएसिडीटी असे ही म्हणतात. हे एक पित्तविषयक आजार आहे. जे काही कारंणास्तव ...