मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: रविवार, 14 मार्च 2021 (08:40 IST)

नाकातील कोरडेपणा दूर करतील हे घरगुती उपाय

नाकाच्या आतील त्वचा कोरडी असल्यास हे उपाय अवलंबवा 
 
1 खोबरेल तेल -नाकात कोरडेपणा जाणवत असल्यास रात्री झोपताना किंवा दिवसातून 2-3 वेळा एक थेंब खोबरेल तेलाची नाकात घाला. या मुळे कोरडेपणा नाहीसा होईल. 
 
2 ऑलिव्ह तेल- उन्हाळ्यात पाणी जास्त पिणे आवश्यक आहे जेणे करून त्वचा ओलसर राहावी. कोरडेपणा जाणवत असेल  तर ऑलिव्ह तेल नाकाच्या आत लावा. या मुळे जळजळ आणि सूज आली असल्यास बरी होईल.   
 
3 व्हिटॅमिन ई कॅप्सूल - हे कॅप्सूल अँटी ऑक्सीडेन्ट आणि अँटी इंफ्लिमेंट्री असतात. हे नाकातील कोणत्याही प्रकारची सूज किंवा जखमेला बरी करतो. या साठी नाकात हे कॅप्सूल तोडून आपल्या बोटाच्या मदतीने लावा. असं 2-3 वेळा केल्याने आराम मिळेल. 
 
4 साजूक तूप- तुपाचा वापर खाण्यासाठी केला जातो त्वचेला सुंदर बनविण्यासाठी देखील तूप वापरतात जुने असलेले तूप खूप फायदेशीर मानले जाते. या मध्ये अँटिसेप्टिक  गुणधर्म असतात.हे सूज कमी करून रक्तस्त्राव कमी करतो. 
 
5 वाफ- नाकातील त्वचा कोरडी झाली असेल तर वाफ यासाठी चांगला पर्याय होऊ शकतो. हे दर दोन दिवसानंतर केल्याने नाकाच्या आतील चांगली स्वच्छता होते. कोरडेपणा देखील नाहीसा होतो.