testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बायको जर नसेल तर.....

Last Updated: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2019 (11:30 IST)
बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे
बायकोला नावं ठेवणे हा
खरंच गंभीर गुन्हा आहे !

खरं पाहिलं तर तिच्याशिवाय
पानही हालत नाही...
घरातलं कोणतंच सुख
बायको शिवाय फुलत नाही !

नोकरी अन पगाराशिवाय
नवऱ्याजवळ आहे काय?तुलनाच जर केली तर
सांगा, तुम्हाला येतं काय?

स्वच्छ, सुंदर,पवित्र घर
बायकोमुळेच असतं...
नवरा नावाचं विचित्र माणूस
तिलाच हसत बसतं !

वय कमी असून सुद्धा
बायको समजदार असते..
बायकोपेक्षा नवऱ्याचे वय
म्हणूनच जास्त असते !

तिचा दोष काय तर म्हणे
चांगल्या सवयी लावते !
कुटुंबाच्या कल्याणासाठी
दिवस रात्र धावते !

चिडत असेल अधून मधून
सहनशीलता संपल्यावर;
तुम्हीच सांगा काय होणार
चोवीस तास जुंपल्यावर ?

बायकोची टिंगल करून
फिदी फिदी हसू नका..
तिच्या यादीत मूर्ख स्थानी
नंबर एक वर बसू नका..
बायको म्हणजे अंगणातला
प्राजक्ताचा सडा !
बायको म्हणजे पवित्र असा
अमृताचा घडा !

बायको म्हणजे सप्तरंगी
इंद्रधनुष्य घरातलं !
देवासाठी गायलेलं
भजन गोड स्वरातलं !

नवरोजी बायकोकडे
माणूस म्हणून पहा..
तिचं मन जपण्यासाठी
थोडं शांत रहा..

कधीतरी कौतुकाचे
दोन शब्द बोलावे
तिच्या वाट्याचे एखादं कामं तरी
आनंदाने झेलावे !
घरासाठी झटणाऱ्या सर्व जणींना मनापासून समर्पित


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

'सिनिअर सिटिझन'चे 'किलर' सॉन्ग आऊट

'सिनिअर सिटिझन'चे 'किलर' सॉन्ग आऊट
अतिशय वास्तववादी आणि विचार करायला लावणारा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर 'सिनिअर सिटीझन' या ...

अन्नू मलिकला इंडियन आयडॉलमधून पुन्हा काढून टाकले, हे आहे ...

अन्नू मलिकला इंडियन आयडॉलमधून पुन्हा काढून टाकले, हे आहे कारण
महिलांना योग्य पद्धतीने वागवले नाही किंवा त्यांना मान सन्मान दिला नाही तर मोठी किंमत ...

'तान्हाजी' मराठीतही होणार डब, अजयने मानले मनसेचे आभार

'तान्हाजी' मराठीतही होणार डब, अजयने मानले मनसेचे आभार
अजय देवगण लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेदार तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा रुपेरी ...

जर्सीमध्ये शाहिद कपूरसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार रोमान्स ...

जर्सीमध्ये शाहिद कपूरसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार रोमान्स करताना
सुपर 30 आणि बाटला हाऊस या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केल्यानंतर आता अभिनेत्री मृणाल ठाकूर ...

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'झोल झाल'

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'झोल झाल'
मराठी सिनेसृष्टीत अनेक मजेदार, विनोदी चित्रपट येत आहेत. यात आणखी भर टाकत, पुढील वर्षात ...