1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा
Written By वेबदुनिया|

तहानलेला कावळा

एकदा एका कावळ्याला फार तहान लागते. तो पाण्याचा खूप शोध घेतो. पण पाणी काही मिळत नाही.
शेवटी त्याला एक भांडे सापडते. त्यात पाणी असते, पण त्याची पातळी खाली गेलेली असते. त्याला पाणी काही पिता येत नाही. मग त्याला एक कल्पना सुचते. तो त्या पाण्यात छोटे खडे टाकायला सुरवात करतो.
खडे पडू लागतात तशी पाण्याची पातळी वाढू लागते. असे करता करता पाणी त्याला पिता येईल एवढ्या पातळीपर्यंत आले. त्यानंतर कावळ्याने भरपूर पाणी प्यायले आणि तो निघून गेला.

उपदेश- प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे