1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (16:04 IST)

बोध कथा :शरीर आणि मनावर नियंत्रण नसल्यास ज्ञान देखील विषसमान

तसं तर भगवान गौतम बुद्ध आपल्या मग्न असायचे. ध्यानमध्ये असायचे आणि शांत राहून आपल्या उपक्रमांनी संदेश देत होते. ते आपल्या सभेत येणार्‍यांवर नजर ठेवायचे. व्यक्तीच्या वागणुकीने त्याबद्दल  जाणून घेत होते.
त्या दिवसांमध्ये सभेत एक नवयुवक येत होता, तो विद्वान होता. परंतु त्याला आपल्या ज्ञानबद्दल अहंकार होता. तो बुद्धांच्या सभेत तोपर्यंत गप्प बसायचा जोपर्यंत बुद्ध स्वत: असायचे. जेव्हा बुद्ध तेथून निघून जायचे  युवक आपल्या ज्ञानाच्या गोष्टी करु लागायचा. लोकांना विचारायचा की माझ्या समोर कोणीही उभं राहू शकतं नाही, काय आहे माझ्यासमान कोणी विद्वान? असा कोणी जो माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यात सक्षम असेल.
लोकांनी बुद्धांना या बद्दल कल्पना दिली. तेव्हा बुद्ध एकदा वेष बदलून ब्राह्मण बनले आणि त्या तरुणाला आश्रमाबाहेर गाठलं आणि त्याला विचारले की आपल्या विद्वत्तेबद्दल काही सांगावे.

तरुण म्हणाला- माझी विद्वत्ता तर स्वयं बोलते, तुम्ही आपल्याबद्दल सांगा, तुम्ही कोण आहात?
बुद्धाने म्हटले की मी तो आहे, ज्याचा आपल्या शरीर आणि मनावर पूर्णपणे हक्क आहे. एक धनुर्धारी ज्याप्रकारे आपल्या धनुषवर हक्क गाजवतो, कुंभार भांडी तयार करण्याचा हक्क ठेवतो, एक स्वयंपाकी 
आपल्या स्वयंपाकघरावर हक्क ठेवतो त्याच प्रकारे माझा माझ्या शरीर आणि मनावर अधिकार आहे.
त्या तरुणाने विचारले की स्वत:वर नियंत्रण असल्याने काय होतं?

तेव्हा बुद्ध म्हणाले की जेव्हा आम्ही आपल्या शरीर आणि मनावर नियंत्रण ठेवतो तेव्हा कोणीही आमचं कौतुक करो वा निंदा, आम्हाला काही फरक पडत नाही. आपल्याला पडतो का फरक?
तेव्हा तरुणाला कळून आले की त्याला तर फरक पडतो. त्याला राग येतो, ईर्ष्या पण होते. आता त्याला कळून चुकले होते की तेव्हा बुद्धाने आपलं खरं रुप घेतलं आणि म्हटलं की जर तुम्ही ज्ञान हासिल केले आहे परंतु तुमचं आपल्या शरीर आणि मनावर नियंत्रण नाही तर हे ज्ञान विषाप्रमाणे काम करेल. तरुणाला कळून चुकले होते.

धडा: हे युग शिक्षणाचे आहे. हल्लीची पिढी उच्च शिक्षण घेईल परंतु त्यांनी आपल्या शरीर आणि मनाला नियंत्रित केले नाही तर हे ज्ञान विकृत होऊन त्यांना चुकीच्या मार्गावर नेईल.