शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (22:52 IST)

बाल कथा : एक चुकीची इच्छा

एकदा एका मधमाशी ने भांड्यात मध गोळा केले आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी देवापुढे सादर केले. देव त्या मध माशी वर प्रसन्न झाले आणि म्हणाले -" मी तुझ्यावर प्रसन्न आहे माग तुला काय वर मागायचे आहे मी ते पूर्ण करेन .
 
मधमाशी हे ऐकून खुश झाली आणि म्हणाली-"  हे सर्व शक्तिमान देवा , जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर मला वर द्या की मी ज्याला चावेंन, त्याला खूप वेदना झाल्या पाहिजेत."
 
देव हे ऐकून खूप रागावले आणि म्हणाले -'' या व्यतिरिक्त तुझी अजून काही इच्छा नाही . पण मी तुझी इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले आहेत, म्हणून तुझी इच्छा पूर्ण करेन .पण माझी एक अट आहे की ज्याला तू चावून दंश करशील त्याला तर त्रास होईलच पण तू देखील त्वरितच मरण पावशील. 
असं म्हणून देव त्याच क्षणी निघून गेले  आणि त्या मुळे मधमाशी चावल्यावर लगेच मरण पावते. 
 
तात्पर्य - जे नेहमी दुसऱ्यांचे वाईट चिंतितो त्याचे नेहमी वाईटच होतं.