गरुडाने घुबडाला विचारले माझा काय दोष

owl
Last Modified बुधवार, 7 एप्रिल 2021 (11:02 IST)
एका जंगलात सोबत राहणारे गरुड आणि घुबड यांचं आपसात मुळीच पटत नसे. एकमेकांशी वैर ठेवून कंटाळून शेवटी त्यांनी एकेदिवस मैत्री करण्याचे ठरविले. दोघांनी शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाणार नाही असे ठरविले.

घुबड गरुडास म्हणाला- माझी पिल्ले कशी असतात हे तर तुला ठाऊक आहे ना? नाहीतर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील. त्यावर गरुड म्हणाला- खरंच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.
घुबड- मी नीट ऐक. माझी पिल्ले फार सुंदर दिसतात. त्यांचे डोळे, पिसे, शरीर सर्वच सुंदर असत. यावरुन माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.

पुढे एके दिवशी एका झाडाच्या ढोलीत गरुडास पिल्ले सापडली. त्यांच्याकडे गरुडाने विचार केला की ही तर घाणेरडी आणि कुरूप पिल्ले दिसत आहे म्हणजे घुबडाची नसणार कारण त्याने सांगितले होते की त्याची पिल्ले फार सुंदर असतात. असा विचार करुन त्याने त्या पिलांचा फडशा उडविला.
नंतर झाडावर आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाला- इतकं समजावून सुद्धा तू माझी पिल्ले मारून खाल्लीस.
गरुड म्हणाला- मी खाल्ली खरी पण त्यात माझा काय दोष. तूच आपल्या पिल्लाचे खोटे वर्णन केलेस, त्यामुळे ती पिल्ले मला ओळखता आली नसल्यामुळे मी ती मारुन खाल्ली. कारण कुरूप पिल्ले घुबडाची नसतात, अस तूच सांगितलं होतं.

तात्पर्य - स्वत:बद्दल खरं काय ते सांगणे भल्याचं ठरतं नाहीतर शेवटी संकट येऊ शकतं.


यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

उन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी

उन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी
*उष्णतेुळे अंगावर घामोळे येणे, उष्णतेमुळे अंग जळजळणे, हिट रॅशेस यासारख्या कारणांनी मुले ...

MPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ...

MPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ऑफिसरच्या 727 पदांवर भरतीसाठी अर्ज करा
मध्‍यप्रदेश लोक सेवा आयोग (एमपीपीएससी) ने मेडिकल ऑफिसर (MO) च्या 727 पदांवर भरतीसाठी ...

घामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय

घामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय
सैंधव मीठ रॉक सॉल्‍ट किंवा सैंधव मीठ यात क्लींजिंग गुण असतात ज्याने घामाचा वास नाहीसा ...

श्रीखंड खाण्याचे फायदे

श्रीखंड खाण्याचे फायदे
श्रीखंड दह्याने तयार केलं जातं. यात आढळणारे घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. हे प्रो-बायोटिक ...

कोव्हिड-19 साथीच्या आजारात घरी करा हे 3 योगासन, तंदुरुस्त ...

कोव्हिड-19 साथीच्या आजारात घरी करा हे 3 योगासन, तंदुरुस्त राहा
कोव्हिड-19 कोरोना व्हायरसच्या या काळात घरी राहणे सर्वात सुरक्षित आहे. अनेक लोक वर्क फ्रॉम ...