गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (17:27 IST)

Hacks: घरातील आरसे साफ करण्यासाठी, हे सोपे हॅक अवलंबवा

दिवाळीची साफसफाई सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत लोक घराच्या प्रत्येक काना कोपऱ्याची साफसफाई करत आहेत. मग ते कपाट साफ करायचे असो की फरशीवरील डाग साफ करायचा असो. प्रत्येकजण घर स्वच्छ करण्यात व्यस्त आहे. दिवाळी काही दिवसांवर आली.  घराचा प्रत्येक लहान-मोठा भाग स्वच्छ करावा लागतो, तेव्हा घरातील आरसे साफ करायला कसे विसरायचे. अनेक वेळा घरातील आरसे जास्त काळ साफ न केल्यास त्यावर डाग दिसू लागतात. त्यामुळे त्यांची स्वच्छता करणे कठीण होऊन बसते. जर आपल्या घरातही असा आरसा असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी  काही टिप्स अवलंबवू  शकता. या टिप्सच्या  मदतीने आपले काम सोपे होईल, या साठी आपण घरातील वस्तूंचा वापर करून आरसा स्वच्छ करू शकता.
 
1 लिंबू -स्वच्छता करण्यास लिंबू शीर्षस्थानी येतो. अनेक वर्षांपासून ते डाग स्वच्छ  करण्यासाठी वापरले जात आहे. लिंबूमध्ये असलेल्या ऍसिडिक गुणधर्मांमुळे, काही मिनिटांत कोणतेही डाग स्वच्छ केले जाऊ शकतात. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये लिंबाचा रस भरून त्यात पाणी मिसळा आणि आरशावर स्प्रे करा नंतर एका टिश्यू पेपरने आरसा स्वच्छ पुसून घ्या.  
 
2 टूथपेस्ट -आरसा स्वच्छ करण्यासाठी टूथ पेस्टचाही वापर केला जाऊ शकतो. हे सर्व प्रकारचे हट्टी डाग काढून टाकते, याच्या मदतीने आपण घरातील  टाइल्स देखील साफ करू शकता. यासाठी आरशावर थोडी टूथपेस्ट लावा आणि हाताने सगळीकडे पसरवा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर हलक्या ओल्या कापडाने स्वच्छ करा. लक्षात असू द्या की या साठी आपल्याला पांढरी टूथपेस्ट वापरायची आहे जेलयुक्त नाही.
 
3 क्लोरीन द्रावण -क्लोरीनच्या मदतीने, आपण सहजपणे हट्टी डाग काढू शकता. क्लोरीनमधील क्लिनींग गुणधर्म काही मिनिटांत आरसा स्वच्छ करेल आणि चमकदार करेल. यासाठी एका कपमध्ये क्लोरीन पावडर आणि गरम पाणी चांगल्या प्रकारे मिसळा आणि नंतर हे द्रावण आरशावर कोरडे होईपर्यंत लावा. नंतर पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. या टिप्सचा अवलंब करून आपण आरशावरील हट्टी आणि चिकट डाग काढू शकता.