मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : सोमवार, 24 जानेवारी 2022 (13:14 IST)

जुनी फुलदाणी फेकून देण्याऐवजी घराच्या सजावटीसाठी अशा प्रकारे वापरा

जर आपल्याला फुलांची आवड असेल, आणि आपण त्यासाठी घरात ठेवायला अनेक फुलदाण्या विकत घेतल्या असतील किंवा भेट म्हणून आपल्याला फुलदाण्या मिळाल्या असतील. पण काही काळानंतर या फुलदाण्या जुन्या दिसू लागतात. नंतर आपण त्यांना फेकून देतो. पण घरात पडलेली जुनी फुलदाणी आपण वेगवेगळ्या प्रकारे घराच्या सजावटीसाठी वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 घरात पडलेली जुनी फुलदाणी आपण पेन होल्डर म्हणून वापरू शकता. यासाठी फुलदाणीला रंग लावा आणि रिबन किंवा रंगीबेरंगी टेपने सजवा. आता आपण ते पेन किंवा पेन्सिल स्टॅन्ड म्हणून स्टडी टेबलवर ठेऊ शकता.  
 
2 घरात असणारी जुनी फुलदाणी फेकून देण्याऐवजी आपण त्यातून फिश एक्वैरियम बनवू शकता. यासाठी फुलदाणीच्या आत काही रंगीत दगड आणि वनस्पती ठेवा. यानंतर फुलदाणी मध्ये पाणी टाकून त्यात मासे टाकावेत. आपले फिश एक्वैरियम तयार आहे.
 
3 मेणबत्ती होल्डर म्हणून आपण घरी ठेवलेली जुनी फुलदाणी वापरू शकता. यासाठी काचेच्या फुलदाणीची आवश्यकता असेल. यासाठी काचेच्या फुलदाण्यामध्ये थोडी वाळू टाका. त्यानंतर त्यात एक मेणबत्ती लावून ती पेटवावी. दिसायला ते खूप सुंदर दिसेल आणि मेणबत्तीचे मेण बाहेर पडण्याची भीती देखील राहणार नाही.
 
4 घरी पडून असलेली जुनी फुलदाणी  कँडी होल्डर म्हणून वापरू शकता. आपण त्यात कँडी भरून तुमच्या किचन काउंटर किंवा ड्रॉईंग रूममध्ये ठेवू शकता. यासाठी काचेची फुलदाणी नीट धुवून वाळवावी. यानंतर त्यात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी कँडीज भरून ठेवा.
 
5 आपण जुन्या फुलदाणीने लॅम्प देखील बनवू शकता. यासाठी काचेच्या फुलदाणीला रंग द्या. आता त्यात रंगीत एलईडी लाईट टाका.आपण हे लॅम्प आपल्या बेडरूममध्ये ठेवू शकता. ते खूप सुंदर दिसेल आणि आपल्या खोलीत हलका प्रकाश देखील राहील.
 
6 आपल्या घरात जुनी फुलदाणी पडली असेल तर आपण ती फुलदाणी स्वयंपाकघर व्यवस्थित करण्यासाठी वापरू शकता. आपण जुन्या फुलदाणीला रंग लावू शकता आणि त्यात उचटने, चिमटे, झारा, चमचे इत्यादी स्वयंपाकघरातील वस्तू ठेवू शकता.