शुक्रवार, 18 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
Last Modified:
शुक्रवार, 25 जून 2021 (16:22 IST)
संबंधित माहिती
राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी
चीनची तिबेटमधली बुलेट ट्रेन अरुणाचल प्रदेशाला खेटून जाणार
अजित पवारांच्या CBI चौकशीची मागणी भाजपने का केली आहे?
ट्विटरने आयटी मंत्री रविशंकर यांचे खाते 1 तासासाठी ब्लॉक केले
शाहरुख खान (SRK)ची सिनेसृष्टीत 30 वर्षे पूर्ण
मी फूल तृणांतिल इवलें
मी फूल तृणांतिल इवलें
जरी तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरीही नाही.
शक्तीनें तुझिया दिपुनी
तुज करीतील सारे मुजरे
पण सांग कसें उमलावें
ओठांतिल गाणें हसरें?
जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचें पातें
अन् स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नातें
कुरवाळित येतील मजला
श्रावणांतल्या जलधारा
सळसळून भिजलीं पानें
मज करतिल सजल इषारा
रे तुझिया सामर्थ्यानें
मी कसें मला विसरावें ?
अन् रंगांचें गंधांचें
मी गीत कसें गुंफावें ?
येशील का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा;
उधळीत स्वरांतुन भवतीं
हळु सोनेरी अभिसारा ?
शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होउनि ये तूं
कधि भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधित हेतू !
तूं तुलाच विसरुन यावें
मी तुझ्यात मज विसरावें
तूं हसत मला फुलवावें
मी नकळत आणि फुलावें
पण तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशा जरी दाही
मी फूल तृणातिल इवलें
उमलणार तरीही नाहीं.
— मंगेश पाडगावकर
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
हरियाली तीज व्रतासाठी शुभ मुहूर्त तिथी आरंभ - २६ जुलै २०२५ रात्री १०:४१ वाजता तिथी संपेल - २७ जुलै २०२५ रात्री १०:४१ वाजता
आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा फायदा होणार
Shani Vakri 2025 १३ जुलै २०२५ रोजी मीन राशीत राहून, शनिदेवाने वक्री म्हणजेच वक्री हालचाल सुरू केली आहे. शनीच्या वक्री हालचालीमुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य बलवान होईल. शनीच्या वक्री हालचालीचा फायदा कोणत्या तीन राशींना होणार आहे ते जाणून घेऊया.
पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळा ऋतू थंडावा आणि आराम आणतो, तर त्वचेसाठी अनेक समस्याही निर्माण करतो. आर्द्रता आणि आर्द्रतेमुळे चेहऱ्यावर चिकटपणा, घाम आणि पुरळ येणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत रासायनिक उत्पादनांपासून आराम मिळणे कठीण होऊ शकते.
पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
पावसाळा येताच आपल्या खाण्याच्या सवयी देखील बदलतात. या ऋतूत काही गोष्टी खाणे फायदेशीर मानले जात असले तरी, काही पदार्थ टाळणे उचित आहे. अशा परिस्थितीत, लोकांच्या मनात एक सामान्य प्रश्न येतो की, पावसाळ्यात वांगी खाणे योग्य आहे का?
मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
Yoga For Neck Hump: चुकीच्या पोश्चरच्या सवयी आजकाल सामान्य झाल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या मणक्यावर आणि मानेवर होतो. संगणकावर वाकून राहणे, तासन्तास मोबाईलकडे पाहणे किंवा बराच वेळ त्याच स्थितीत बसणे. या सर्व सवयींमुळे मानेमागे कुबडा तयार होतो.शरीराचे संतुलन, पोश्चर आणि आत्मविश्वास यावर देखील परिणाम करते
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पौराणिक कथा : भगवान विष्णूचे चक्र कसे अस्तित्वात आले?
Kids story : एकदा नारायण, ज्यांना आपण भगवान विष्णू असेही म्हणतो, त्यांनी विचार केला की ते त्यांच्या सर्व देवतांचे देव महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी एक हजार कमळाची फुले अर्पण करतील. पूजेसाठी सर्व साहित्य गोळा केल्यानंतर, ते त्यांच्या आसनावर बसले. आणि डोळे बंद करून संकल्प पुन्हा केला आणि विधी सुरू केला.
पावसाळ्यात शेव-फरसाण नरम पडून चव बिघडते याकरिता अवलंबवा या सोप्या टिप्स
पावसाळा मनाला आराम देत असला तरी, स्वयंपाकघरासाठी ते एक नवीन आव्हान बनते. या ऋतूतील आर्द्रता भिंती किंवा कपड्यांपुरती मर्यादित नसून, शेव मिक्चर देखील मऊ करते. यामुळे चव खराब होते आणि कधीकधी संपूर्ण पॅक खराब होतो. याकरिता काही सोप्या स्वयंपाकघरातील युक्त्या अवलंबल्याने तुम्ही तुमचे नाश्ते बराच काळ कुरकुरीत आणि ताजे ठेवू शकता.
इंदूरचे लोक नैराश्य, चिंता, निराशा आणि आत्महत्येच्या प्रवृत्तींना बळी पडत आहे, ६ महिन्यांत ५५ टक्के पुरुषांनी मदत मागितली
इंदूर हे देशातील सर्वात वेगाने वाढणारे शहर आहे. एकीकडे हे शहर अति-आधुनिक आणि कॉर्पोरेट होत आहे, तर दुसरीकडे ते लोकांना आतून खात आहे. सतत वाढत्या आत्महत्या, एकटेपणा, नैराश्य आणि दुःख या येथील लोकांच्या नवीन समस्या आहे. चिंताजनक बाब म्हणजे पुरुषांसोबत बदल होत आहे. डॉक्टर या समस्यांना घातक मानत आहे. ते म्हणतात की नोकरी आणि जीवनाच्या वाढत्या धावपळीत, स्वतःसाठी प्राधान्यक्रम देखील निश्चित करावे लागतील.
रात्री जेवणात बनवा स्वादिष्ट भरलेल्या कारल्याच्या भाजी
साहित्य- कारले-सहा बटाटे - दोन मध्यम कांदा -एक मोठा हिरव्या मिरच्या - दोन कोथिंबीर मीठ - चवीनुसार हळद - अर्धा टीस्पून
घरी बनवा हेल्दी रेसिपी Banana Chocolate Protein Brownies
साहित्य- दोन -पिकलेली केळी अर्धा कप- ओट्सचे पीठ १/४ कप- कोको पावडर अर्धा कप- दही १/४ कप- मध किंवा मॅपल सिरप अर्धा चमचा- बेकिंग पावडर १/४ चमचा- बेकिंग सोडा अर्धा कप- प्रोटीन पावडर १/४ कप-डार्क चॉकलेट चिप्स